( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात आज यंदा तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्यदिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रीराम मंदिरासह शरयु घाटावर तब्बल २५ लक्ष दिवे लावण्याचे संकल्प हिंदू समाजाने केला आहे.
Read More
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर १०० ढोल व ३० ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्री रामाला वंदन केले जाणार आहे. यावेळी भाजपाचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव येथे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक, सांस्कृतीक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदु असलेल्या अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापणा होणार आहे. यानि
श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ लाख २३ हजार लाख दिव्यांना प्रज्वलित करून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३० लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघाली आहे. दीपोत्सव २०२३ द्वारे नवा विक्रम करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात प्रमाणपत्र स्वीकारले आहे.
आज दीपोत्सवातील नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन. या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्यानिमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन....
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जगभरातील कोट्यवधी राम भक्तांना सायंकाळी दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे शुक्रवारी करण्यात आले आहे. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामललाच्या नुतन विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
’समतोल’च्या सेवाकार्याला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. २००४ मध्ये सुरू झालेले सेवाकार्य नव्हे एक मोहीम सातत्याने सुरू आहे. ’समतोल’नव्या नव्या उपक्रमात उतरुन यशस्वी होत आहे. समाजशिल उपक्रमामध्ये कार्यरत असलेल्या ’समतोल’च्या ’रोज सेवेसाठी १ रुपया’ नव्या उपक्रमाबद्दल इथे माहिती देत आहोत.
संपूर्ण महाराष्ट्राला आता ओढ लागली आहे गुढीपाडव्याच्या आनंदोत्सवाची, शोभायात्रांची. भारतीय नव वर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक वारसा जपत ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात सर्वत्र केले जाते. या अनुषंगाने विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम तसेच समाजउपयोगी उपक्रम विविध संस्था हाती घेत आहेत.
अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे
'आपला मराठमोळा दीपोत्सव' : मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मराठमोळ्या दीपोत्सवाला वरळीच्या जांबोरी मैदानावर जल्लोषात सुरुवात झाली आहे. मुंबई भाजपचे आयोजन, एकाहून एक सरस कलावंतांचे सादरीकरण आणि त्याला मुंबईच्या राजकीय वातावरणाची खमंग फोडणी यामुळे ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीतही भाजपचाच बोलबाला असल्याचे दिसून येत आहे.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने 'मुंबई भाजप'ने जोरदार कंबर कसली आहे. संपूर्ण मुंबईत गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या नंतर आता दीपावली कार्यक्रमांचे आयोजन करून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे गटाला मात दिली आहे.
घरातून विविध कारणांनी पळून आलेली, स्वप्न हरवून बसलेली, रेल्वेस्थानकावर भीक मागून, कचरा गोळा करून, बूटपॉलिश करून अंध:कारमय जीवन कंठणार्या या निष्पाप कळ्यांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करणार्या 'समतोल फाऊंडेशन' या संस्थेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.