भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
Read More
डोंबिवली : दिवाळी म्हंटली की फटाके फोडायचे मजा करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ( Fort construction ) हुबेहूब बांधून त्याला कोणी काही करणार नाही यासाठी अहोरात्र काळजी घ्यायची. डोंबिवलीतल्या शेकडो बच्चेकंपनीने टिळकनगर, पेंडसेनगर, फडके पथ, रामनगर, पश्चिमेला कोपर, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा या सर्व भागात एकसे एक गडकिल्ले बांधले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाने सलग पाचही सामन्यात विजय मिळवित उत्तम रनरेटसहित १० गुणांच्याआधारे गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. या गुणांसह टीम इंडियाचा सेमी फायनलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळविला होता.
तब्बल अर्धा डझनांहून अधिक छंद जोपासून त्यांचे तितकेच चिकाटीने जतन आणि संवर्धन करणार्या आणि ‘लिम्का बुक’नेही नोंद घेतलेल्या छंदिष्ट श्रुती गावडेची ही छंदकथा...
अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावातील कळसुबाई पर्वत रांगेत वसलेल्या रतनगडावरील गर्दीवर आता चाप बसणार आहे. महसूल व वन विभागाने काढलेल्या सूचनेनुसार रतनगडावर गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवार केवळ ३०० पर्यटकांना (ट्रेकिंग) रतनगडावर जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असल्यामुळे या गडावर अनियंत्रित गर्दी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी या बाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी बैलघाट मार्गे ट्रेकिंगसाठी बाहेर पडलेले सहा युवक मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने या सहा जणांना घोडेगाव पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवून रविवारी रात्री सुखरूप बाहेर काढले.
ब्रिटीश शीख आर्मी अधिकारी आणि फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीत चंडी यांनी अंटार्क्टिक खंडाची सोलो ट्रेक पूर्ण करून नवा इतिहास रचला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी अवघ्या ४० दिवसांत त्यांनी हा अनोखा विक्रम केला आहे.
आधी ट्रेकिंगच्या क्षेत्रात आणि सध्या नाशिकच्या ‘बाईकर्स ग्रुप्स’मध्ये आपली ‘रायडर राजा’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या भूपेश खैरनारविषयी...
ट्रेक म्हणजे नुसती पायपीट नाही, ना नुसते निसर्गाचे फोटो काढणे, ना बाकीचे करतात म्हणून आपण करणे. ट्रेक म्हणजे आपण स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करणं. आपली शारीरिक क्षमता पडताळण. नवीन लोकांच्या सहवासात जाऊन त्यांना आपलंसं करणं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राजाचा वारसा आणि त्याच महत्त्व जपणे आणि ते संपूर्ण जगाला दाखवणे.
साहसी उपक्रमांमध्ये सहभागी सदस्य आणि पर्यावरण यांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, यावर्षी 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' या संस्थेची स्थापना करण्यात आली. याचे औचित्य साधून 'मुंबई तरुण भारत' ने 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' चे अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांच्या मुलाखतीतून या संस्थेविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घेतले.
हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या २० ट्रेकर्सनी गड उतरण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व ट्रेकर्स कल्याणचे रहिवासी आहेत.
हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगसाठी गेलेले ३५ विद्यार्थी बेपत्ता झाले होते. हे विद्यार्थी आयआयटीचे असून ते सुरक्षित असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
कोणताही तर्कवितर्क न लावता, केवळ शिवकालीन पत्रे व पुराव्यांच्या आधारांवर आप्पा इतिहास सांगतात. त्यांच्या तोंडून शिवशौर्य ऐकताना ते चित्रच जणू आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
टवाळ्यातील महागणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अंगारक संकष्ठी चतुर्थी निमीत्ताने लाखो भाविक भक्तांनी रीघ सकाळपासून पाह्याला मिळाली
बदलापुरचे चार जण तर इतर सात जण उर्वरित महाराष्ट्रातले होते
लहानपणी साताऱ्यांच्या अजिंक्य तारा गडाच्या निमित्ताने तिला गिरी-भ्रमंतीचा छंद जडला आणि आता जगभरातील उंच शिखरं तिला खुणावू लागली.