महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवार दि. ९ रोजी एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात ८६००० कर्मचारी संपात सहभागी होतील असा कर्मचारी संघटनांचा अंदाज आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महावितरण’ने गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षांत कंपनीच्या वीजखरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘महावितरण’ने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल. यानिमित्ताने ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. अशावेळी सर्वच प्राधिकरणे, महापालिका, प्रशासकीय यंत्रणा आणि वीजवितरण कंपन्या आता मुंबईतील पावसाळ्यासाठी सज्ज आहेत. याच प्राश्वभूमीवर आता मुंबईला वीजपुरवठा करणारी प्रमुख कंपी असणाऱ्या टाटा पॉवरने मुंबईमध्ये विनाअडथळा वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. प्रतिबंधात्मक उपाय आणि सिस्टिम अपग्रेड करून पावसामुळे येणाऱ्या अडचणी प्रभावीपणे दूर करणे हे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे.
ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे निर्देश कपिल पाटील यांनी दिले.
पुणे : पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणार्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.
पुणे : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या (132 केव्ही) अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच, रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड या परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा दि. २३ व २४ मे रोजी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रिपिंगमध्ये रविवारी बिघाड झाल्याने मुंबईचा वीजपुरवठा तासभराचा खंडित झाला होता. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अँटॉप हिल, भुलेश्वर, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी या भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता
कल्याण पुर्वेतील अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी
सध्या काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने महावितरणची यंत्रणा पावसाळ्यापुर्वीच्या कामावर लागली आहे. पावसाळ्यासाठी पूर्व तयारी करून महावितरण नेहमीच सज्ज असते. परंतु, काही अनपेक्षित कारणामुळे पावसाळ्यात कधी-कधी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.
वाढीव थकीत वीजपुरवठा खंडित करण्याबाबत घेतलेले एकतर्फी निर्णय मागे घेण्याची भाजपची
‘लॉकडाऊन’ काळात कोरोना संकटाबरोबरच नागरिकांना महावितरणामार्फत येणार्या भरमसाठ वीजबिलांचे संकटदेखील झेलावे लागले
मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट नितीन राऊत यांनी केले
विजपुरवठा खंडीत झाल्याने आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यावर या वीज नसल्याने प्रभाव पडला आहे. मुंबई उपनगरातील अनेक पट्ट्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सकाळी वीज बंद झाल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. जोपर्यंत पूर्णपणे वीजपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाण्याची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने उद्या दुपारपर्यंत मुदत दिली आहे. मंगळवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
साताऱ्यामधील कोयना धरणामध्ये केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक
वीजपुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकर संतप्त होत आहेत
’वसई-विरार क्षेत्रात महावितरणचा भोंगळ कारभार’ या मथळ्याखाली दि. ३ जून रोजी दै. ’मुंबई तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.