मुंबई: मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रिपिंगमध्ये रविवारी बिघाड झाल्याने मुंबईचा वीजपुरवठा तासभराचा खंडित झाला होता. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अँटॉप हिल, भुलेश्वर, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी या भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकलसेवेलाही याचा फटका बसला. तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा तासाभराची ठप्प झाली होती. ठाणे जिल्ह्यातील ट्रॉमबे येथे वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे रविवारी सकाळी मुंबई ठप्प झाली. सकाळी ११च्या सुमारास हा वीजपुरवठा पुरवावा करण्यात आला.
या बिघाडाबद्दल मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टने याबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शहराला वीजपुरवठा करण्यासाठी टाटा कंपनीकडून वीज पुरवण्यात येते. टाटा कंपनीने या वीज खोळंब्यासाठी महापारेषणला जबाबदार धरले आहे. महापारेषणच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने हा खोळंबा झाला होता पण टाटा कंपनीकडून हा वीज पुरवठा सुरळीत केला गेला आहे अशी माहिती टाटा कंपनीकडून देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत असाच वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या घटनेची आठवण करून देणारीच आजची घटना होती.