घातपाताची शक्यता म्हणून जबाबदारी कशी टाळाल ? राम कदमांचा सवाल

    14-Oct-2020
Total Views | 110

ram kadm_1  H x



मुंबई :
मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट नितीन राऊत यांनी केले. राऊतांच्या या ट्विटला आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. घातपाताची शक्यता म्हणून राज्य सरकारला जबाबदारी कशी टाळता येईल? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी विचारला.


भाजप आमदार राम कदम यांनी ऊर्जामंत्र्यांना प्रश्न विचारताना सरकार आपली जबाबदारी कशी झटकू शकतं? असा सवाल केलाय. त्याचबरोबर ‘कोट्यवधी लोकांची गैरसोय झाली, त्यांना त्रास झाला, संपत्तीपासून सर्वच गोष्टींचे नुकसान झालं. याला जबाबदार तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे, त्यामुळं उगाच अशी वक्तव्य करुन तुम्हाला लोकांची दिशाभूल करता येणार नाही,’ असे प्रत्युत्तर कदम यांनी दिले.


दरम्यान, सोमवारी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागातील वीज पुरवठा तब्बल तीन तास खंडित झाला होता. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. लोकल वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालयातील यंत्रणा, कोविड सेंटर आणि दैनंदिन कामांवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121