तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री सन्मानित कोटा श्रीनिवास राव यांचं आज वयाच्या ८३व्या वर्षी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Read More
उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट’ असा उल्लेख मिळवणाऱ्या या महाकाव्यावर निर्मात्यांनी अफाट खर्च केला असून, त्यामुळेच हा चित्रपट ‘हिट’ ठरवण्यासाठीही त्याला तितक्याच मोठ्या संख्येने कमाई करावी लागणार आहे.
चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यावर पहिल्या तीन दिवसांत समीक्षा न करण्याची मागणी तमिळ फिल्म अॅक्टिव्ह प्रोड्यूसर्स असोसिएशन (टीएफएपीए) ने एका याचिकाद्वारे केली होती. लोकांना चित्रपट पाहण्याचा आणि गुणवत्तेचा आढावा घेण्याचा हा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकाराचा भाग आहे, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद वेंकटेश यांनी गुरूवार दि.२७ जून रोजी ही याचिका फेटाळून लावली आहे.
मराठी प्रेक्षकांची आवड दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत चालली आहे, आणि त्यांना काहीतरी वेगळं, विचार करायला लावणारं पाहायला मिळालं की, ते डोक्यावर घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय ‘जारण’ या सिनेमाने. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, सामाजिक भावनांचा आणि भयपटाच्या शैलीचा अनोखा मेळ साधणाऱ्या या सिनेमाने केवळ समीक्षकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई सि
'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्केंत फाइल्स' सारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या 'फाइल्स ट्रिलॉजी' तील शेवटच्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट ' द बंगाल फाइल्स' चा टीझर गुरुवारी १२ जूनला अधिकृतपणे प्रदर्शित झाला. या टीझरने काही तासांतच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'श्याम' आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या 'ऑल इज वेल' या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा 'ऑल इज वेल' हा च
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते.
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडीपट हाउसफुल ५ ची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय. येत्या ६ जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून, सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे.
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या 'आंबट शौकीन'चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवार, दि. २३ मे रोजी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आयसीयूमध्ये उपचार घेत होते.
मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी १७ मे रोजी नागपूरच्या रामकृष्ण मठात सायंकाळी ४:३० च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या भावाला भेटायाला नागपूर येते दाखल झाले होते. शनिवार सायंकाळी त्यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर, सांस्कृतिक विश्वात एकच खळबळ उडाली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
Banjara movie review ‘बंजारा’ हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर एक भटकंती करणारा, सतत नवनवीन वाटा धुंडाळणारा, स्थिर न राहणारा आणि प्रवासातच जगणारा एक चेहरा तरळतो. हाच भाव ‘बंजारा’ चित्रपट आपल्यासमोर मांडतो, एक हळव्या आठवणींनी गुंफलेला, मैत्रीच्या नात्याने सजलेला आणि आत्मशोधाच्या प्रवासातून उलगडणारा अनुभव...
सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा ‘स्टाईल आयकॅान’ असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीचा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतोय.
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला गुन्हेगारी थरारपट ‘रेड २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच गती पकडून आहे. प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी या चित्रपटाने कमाईत उंच झेप घेतली. Sacnilk च्या अहवालानुसार, दुसऱ्या रविवारी ‘रेड २’ ने ११.७५ कोटी रुपयांची कमाई केली, जी शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या कमाईपेक्षा जास्त आहे.
तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विशाल रविवारी (११ मे) तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे झालेल्या ‘मिस कूवगम ट्रान्सजेंडर ब्युटी कॉन्टेस्ट २०२५’ दरम्यान अचानक व्यासपीठावर कोसळल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेल्या दिग्दर्शक उत्तम महेश्वरी यांनी अखेर माफी मागितली आहे. शनिवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्यांनी स्पष्ट केलं की, “हा चित्रपट प्रसिद्धी किंवा कमाईसाठी नव्हे, तर आपल्या जवानांच्या धैर्य, बलिदान आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन करतो आहे.”
प्रेम म्हणजे नुसतीच एक भावना नसते, ती एक निस्सीम आर्तता असते, एक समर्पण असते, जे कुणासाठी तरी स्वतःला हरवून देणं शिकवतं. या भावना मनोरंजन क्षेत्रात अनेकदा मांडल्या जातात, पण प्रत्येकवेळी त्या नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ’माझी प्रारतना’ हा चित्रपटही त्याच परंपरेतला एक तरल आणि भावनिक प्रवास आहे, ज्यात प्रेमाचं रूप वेगळं असलं, तरी त्याचा गाभा तोच निःस्वार्थ, निर्मळ आणि नितळ.
“माझा देश हा विनाकारण पुरावे नसताना भरडला जात आहे. इथल्या नागरिकांवर बेछुट हल्ले केले जात आहेत. माझ्या देशावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच. मला माझ्या देशावर अभिमान आहे. पाकिस्तानला विनाकारण पुरावे नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.”, अशी गरळ पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने ओकली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे यांच्या नवनिर्मित चित्रकृतींच्या प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनात त्यांनी धोत्रे यांच्या विविध कलाकृतींचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या अप्रतिम चित्रशैलीला दाद दिली.
प्रेमाच्या कोशिंबिरीत रोजच्या नात्यांचे चविष्ट तुकडे असतात, पण काही चवी जिभेवर रुळायला थोडा वेळ लागतो, अगदी गुलकंदासारखं! गुलाबाच्या पाकळ्या जशा साखरेत मुरतात, काळाच्या कुशीत विश्रांती घेतात आणि मग कुठे त्या चवीला गंध लाभतो. ’गुलकंद’ हा चित्रपटसुद्धा तसाच एक अनुभव देऊन जातो. ही केवळ प्रेमकथा नाही, ही आहे भावना, नात्यांचे अस्पष्ट कंगोरे आणि त्या नाजूक नात्यांत मिसळलेला दाट गोडवा. कधी अल्लड हास्य, कधी सुस्कारा, तर कधी हलकासा सल, अशा मानवी भावनांचे मिश्रण एकत्रित करत ही कथा आपल्याला प्रेमाच्या गूढतेकडे, त्याच्
सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. दि. 16 मे रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ आणि पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो सिख धर्मगुरु श्री गुरु नानक यांच्या रूपात दिसतो. या पोस्टरमध्ये 'लवकरच ट्रेलर येणार' अशी देखील घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी हा आमिरचा आगामी चित्रपट समजून चर्चा सुरू केली. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी आहे. फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' हे तीन चित्रपट अधिकृत निवडीस पात्र ठरले आहेत, तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची खास निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय घोषणेची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच 'एआय' तंत्रज्ञानाचा मोठा गाजावाजा सुरू असतानाच, कन्नड चित्रपटसृष्टीने एक अभूतपूर्व पाऊल उचललं आहे. 'लव यु' नावाचा चित्रपट संपूर्णपणे एआय च्या मदतीने तयार करण्यात आला असून, हा अशा प्रकारचा जगातील पहिलाच चित्रपट ठरतो. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती केवळ १० लाख रुपयांत करण्यात आली आहे.
सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाने ईदला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली, पहिल्या दिवशी ३० मार्च रोजी तब्बल २६ कोटींची कमाई केली. काही ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल्ल गेला, मात्र काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने तो थिएटरमधून काढण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शनातून दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.
पंढरीची 'वारी' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे.
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशक
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
प्रेम, नातेसंबंध आणि हास्याचा सुरेख संगम साधणारा ‘हार्दिक शुभेच्छा’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. चित्रपटाची सुरुवातच मुळी एका मजेशीर ‘व्हॉईस ओव्हर’ने होते, जो लगेचच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. माधव (पुष्कर जोग) हा एक सरळसोट, प्रेमाच्या शोधात असलेला तरुण. त्याच्या पालकांनी त्याच्या लग्नाची जबाबदारी उचलली असून, सतत नव्या मुलींचे फोटो ते त्याला पाठवत असतात. पण, माधवला त्याच्या मनासारखी मुलगी काही पसंत पडत नाही. त्याचा मित्र रवी (पृथ्वीक प्रताप) त्याला सतत प्रोत्साहन दे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यशस्वी ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत हा ऐतिहासिक सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. रिलीजनंतर ३५ दिवसांनंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जोरदार सुरू असून, कमाईचे विक्रम मोडत आहे.
नेटफ्लिक्सवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध असतात. नुकतीच नेटफ्लिक्सने त्यांच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही काही महत्त्वाचे सिनेमे मिस केले असतील, तर ही यादी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चि
मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ घेऊन आले आहेत 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर! महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आपल्या जवळच्य
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
Chhawa छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
२०२५ हे वर्ष ऐतिहासिक मराठी चित्रपटांसाठी विशेष ठरणार आहे. भक्ती आणि शौर्य यांचा संगम असलेले विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'शिवराज अष्टक' नंतर नवे ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि शिवरायांचा छावा या चित्रपटांद्वारे मराठा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडला. आता ते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आनंदडोह हे दोन चित्रपट घेऊन येत आहेत.
#Chhaava #ChhaavaMovie #VickyKaushal छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या इतिहासावर आपल्या विचारधारेला जगवणारी गिधाडे महाराजांच्या इतिहासाबद्दल जनतेची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. #Chhaava #ChhaavaMovie #VickyKaushal #LakshmanUtekar #ChhatrapatiSambhajiMaharaj #ChhatrapatiShivajiMharaj #MahaMTB
धर्मांतरणाचे आमिष नाकारल्याने छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या औरंगजेबाने केली, हाच खरा इतिहास आहे. ‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने औरंगजेबाच्या विरोधात निर्माण झालेला रोष, कसलाही आकार धारण करू नये, म्हणून सध्या बाटग्यांची धावपळ सुरू आहे.
संपूर्ण देशभरात सध्या 'छावा' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारिता हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी सगळीकडून करण्यात येत होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"बालपणातील निरागसतेचा शोध घेत ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट हृदयस्पर्शी प्रवास उलगडतो. संकेत माने दिग्दर्शित आणि मायरा वैकुलच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा चित्रपट मुलांच्या कोड्यात पडणाऱ्या प्रश्नांचा शोध घेतो. हा सिनेमा पाहण्यासारखा का आहे? संपूर्ण समीक्षा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!"
(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
(Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित
Emergency movie भारतासह जगभरामध्ये कंगना राणौतचा इमर्जन्सी चित्रपट (Emergency movie) १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनादरम्यान लंडनच्या एका सिनेमा हॉलमध्ये खलिस्तानी कट्टरवाद्यांनी गोंधळ घातला आहे. त्याने चित्रपटगृहामध्ये घुसून चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यावेळी त्याने खलिस्तानी जिंदाबाद अशाही घोषणा देण्याचे काम केले. यामुळे सिनेमागृहामध्ये गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.
चित्रपट हे जरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यातून जीवन जगण्याचे विविध दृष्टिकोन समोर येतात. चित्रपटाची निर्मिती ही प्रेक्षकांना आकर्षित करणारी आणि गुंतवून ठेवणारी असावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘सिनेमॅन’ ( Cineman ) हा चित्रपट. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन उमेश मोहन बागडे यांनी केले असून २१व्या ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शन करण्यात आले. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या चित्रपटाविषयी...
आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी बीकेसी येथे अभिनेत्री कंगना रणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी ते बोलत होते.
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.
अभिनेत्री-दिग्दर्शिका कंगना राणावत हिचा 'इमर्जन्सी' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. खरं तर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट विविध वादांमध्ये सापडला होता. यापूर्वी बऱ्याचवेळा या चित्रपटाची नियोजित प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली होती. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आता अखेर चित्रपट प्रदर्शित होत असताना कंगना राणावत हिने राजकीय चित्रपटांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.