हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री सन्मानित कोटा श्रीनिवास राव यांचं आज वयाच्या ८३व्या वर्षी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता विष्णु मांचू यांनी सोशल मीडियावर कोटा राव यांचा फोटो शेअर करत लिहिलं, "शब्दांपलीकडचा एक महान कलाकार. श्री कोटा श्रीनिवास गरू यांच्या निधनाने मन खूप हळवं झालं आहे. ते ज्या भूमिकेत असायचे, ती भूमिका जिवंत व्हायची. विनोद, खलनायकी किंवा गंभीर व्यक्तिरेखा त्यांनी प्रत्येक पात्रात विलक्षण रंग भरला. मी त्यांच्या सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांच्या अभिनयातून सिनेमाविषयीचं प्रेम शिकत गेलो. त्यांचं हास्य, त्यांची कला आणि आत्मा आपल्या स्मृतींमध्ये सदैव जिवंत राहतील."
मेगास्टार चिरंजीवी यांनीही ट्विट करत कोटा यांना श्रद्धांजली वाहिली असून लिहिलं, "एक अभिजात आणि चतुरस्त्र अभिनेता म्हणून कोटा श्रीनिवास राव यांचं स्थान अमोल आहे. त्यांच्या जाण्याने एक युग संपलं आहे."
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत म्हटलं, "चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर चार दशके काम करून कोटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. त्यांनी साकारलेल्या खलनायकी व चरित्र भूमिका सदैव आठवणींमध्ये राहतील. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीने एक अनमोल रत्न गमावलं आहे. १९९९ मध्ये त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो."
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा श्रीनिवास राव हे गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार काही आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोटा श्रीनिवास राव यांनी १९७८ साली ‘प्राणम खरीदू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांतील ५०० हून अधिक चित्रपटांत काम केलं. २०१५ साली त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २००५ मध्ये राम गोपाल वर्माच्या ‘सरकार’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात त्यांनी ‘सिल्वर मणी’ ही लक्षवेधी भूमिका साकारली होती.
त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू, अभ्यासू आणि गुणी कलाकार हरपला आहे. त्यांच्या स्मृती आणि कलाकृतींमुळे ते सदैव आपल्या मनात अजरामर राहतील.तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री सन्मानित कोटा श्रीनिवास राव यांचं आज वयाच्या ८३व्या वर्षी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता विष्णु मांचू यांनी सोशल मीडियावर कोटा राव यांचा फोटो शेअर करत लिहिलं, “शब्दांपलीकडचा एक महान कलाकार. श्री कोटा श्रीनिवास गरू यांच्या निधनाने मन खूप हळवं झालं आहे. ते ज्या भूमिकेत असायचे, ती भूमिका जिवंत व्हायची. विनोद, खलनायकी किंवा गंभीर व्यक्तिरेखा – त्यांनी प्रत्येक पात्रात विलक्षण रंग भरला. मी त्यांच्या सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांच्या अभिनयातून सिनेमाविषयीचं प्रेम शिकत गेलो. त्यांचं हास्य, त्यांची कला आणि आत्मा आपल्या स्मृतींमध्ये सदैव जिवंत राहतील.”
मेगास्टार चिरंजीवी यांनीही ट्विट करत कोटा यांना श्रद्धांजली वाहिली असून लिहिलं, “एक अभिजात आणि चतुरस्त्र अभिनेता म्हणून कोटा श्रीनिवास राव यांचं स्थान अमोल आहे. त्यांच्या जाण्याने एक युग संपलं आहे.”
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत म्हटलं, “चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर चार दशके काम करून कोटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. त्यांनी साकारलेल्या खलनायकी व चरित्र भूमिका सदैव आठवणींमध्ये राहतील. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीने एक अनमोल रत्न गमावलं आहे. १९९९ मध्ये त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो.” मिळालेल्या माहितीनुसार, कोटा श्रीनिवास राव हे गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार काही आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोटा श्रीनिवास राव यांनी १९७८ साली ‘प्राणम खरीदू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांतील ५०० हून अधिक चित्रपटांत काम केलं. २०१५ साली त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २००५ मध्ये राम गोपाल वर्माच्या ‘सरकार’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात त्यांनी ‘सिल्वर मणी’ ही लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू, अभ्यासू आणि गुणी कलाकार हरपला आहे. त्यांच्या स्मृती आणि कलाकृतींमुळे ते सदैव आपल्या मनात अजरामर राहतील.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.