(Earthquake hits Delhi-NCR) दिल्ली एनसीआर भागात गुरुवारी १० जुलैला सकाळी मुसळधार पाऊस चालू असतानाच भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ९:०४ वाजता हरियाणातील झज्जर येथे ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. १० सेकंद जमीन हादरत होती.दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार व सोनीपत भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
Read More
आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, ही सनातन संस्कृतीतील एक अत्यंत पावन पर्वणी मानली जाते. अखिल मानवसमाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी अनंत वेदराशीचे चार शाखांमध्ये विभाजन केले, पुराणे व महाभारत अशा लोकोत्तर ग्रंथांना शब्दबद्ध करून एक शाश्वत ज्ञानदीप प्रज्वलित केला, त्या महर्षी वेदव्यासांचे तसेच त्यांचे पाईक असणार्या समग्र गुरुपरंपरेचे पूजन आजच्याच दिवशी केले जाते. समाजाला शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखविणार्या ‘गुरु’तत्त्वाविषयीची भक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्या पूर्वसूरींनी आजच्या या दिनविशेषाची योजना
चराचरातील ऊर्जेचा स्रोत असलेल्या आई जगदंबेच्या स्तवनाची अनेक स्तोत्रे आदि शंकराचार्य यांनी रचली. या स्तोत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनांसाठी आई भगवतीच्या उपासनेचा मार्ग सुलभ केला. आईची मानसपूजा करणार्या मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्राचा हा भावानुवाद...
'सिंदूर' उड्डाणपुलामुळेकर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली गेली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांच्या हस्ते 'सिंदूर' उड्डाणपुलाचेलोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बुधवारी ९ जुलैला ८ देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहेत. यामध्ये ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेले हे कर 'अन्याय्य व्यापारी असमतोल' सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी तब्बल २२ देशांना टॅरिफ कराबाबत पत्रं पाठवली आहे.
चातुर्वर्ण्य आपल्या शरीराभोवती एक तेजोवलय असते. प्रत्येक व्यक्तीच्या तेजोवलयाचा वर्ण त्याच्या गुण, कर्म, संस्कारानुरूप राहतो. व्यक्तिगणिक असे वर्ण अनंत असतील परंतु, या सर्व वर्णवलयांची विभागणी ऋषींनी प्रमुख केवळ चार उपविभागात केली आणि प्रत्येक वलयवृत्तीनुसार साधना करणे सुलभ जावे म्हणून चातुर्वर्ण्याच्या आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचनाही केली. वर्ण आधारावर केलेली मानवी समाजाची रचना म्हणजेच चातुर्वर्ण्य रचना होय.
उबरने मुंबईसाठी काही नवीन सुविधा जाहीर केल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे.पहिली सेवा आहे ‘मेट्रो तिकीट बुकिंग’. आता उबर अॅपमधून मेट्रो तिकीट खरेदी करता येणार. प्रवाशांना एकाच अॅपमधून कॅब आणि मेट्रोची योजना करता येईल. सुरुवातीला ही सेवा मुंबई मेट्रोच्या 1, 2A, 3 आणि 7 या लाईनसाठीच असेल.
मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी आता कामाचा वेग वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एमएमआरडीए ने कामगारांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या मुख्य मार्गांवर जास्त कामगार तैनात करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मेट्रोच्या कामात गती येणार आहे. मुंबईकरांना लवकरच नवीन मेट्रोसेवा वापरता येईल.
गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
वसई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी बुधवार, ९ जुलै रोजी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या हाताने तयार केलेल्या विविध भेटवस्तू दिल्या.
कोठडीत आरोपींवर छळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना केवळ सरकारी परवानगी असल्याच्या कारणावरून वाचवले जाऊ शकते, या कायद्याच्या तरतुदीवर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कौसर एडाप्पागथ यांच्या खंडपीठाने ‘सुधा विरुद्ध केरळ राज्य’ या प्रकरणात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम २१८ नुसार पोलिसाच्या सरकारी संरक्षणाबाबतीत निर्णय नुकताच दिला आहे.
शहापूरच्या शाळेतील कृत्य हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला.
(Vadodara Bridge Collapse Update) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नदीपात्रातून ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही काहीजण बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
१०० वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. १० जुलै रोजी ही घोषणा विधानसभेत केली.
Rahul Narvekar felicitated program organized by the Cuffe Parade Federation.
जिल्हाधिकारी आंचल गोयल; ‘झेप: एक पाऊल कौशल्याकडे’ कार्यक्रमात मार्गदर्शन “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करा आणि विविध कौशल्ये आत्मसात करा. मोबाइलचा वापर सोशल मीडियापेक्षा शासकीय योजनांसाठी अधिक करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला विकसित करा,” असे प्रेरणादायी उद्गार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार, दि. ९ जुलै रोजी काढले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपाहारगृह, भूमी खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
“ विद्यार्थी ज्यावेळेस गुरुकडे एखादी गोष्ट शिकायाला जातो, तेव्हा संपूर्ण शरणागतीच्या भावनेने त्याने जावं. गाण्याच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की गुरुला शरण गेल्याशिवाय संगीत साधना अशक्य आहे.” असे मत सुप्रसिद्ध व्होयलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी आपल्या सांगितीक प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की “ मी ज्या मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले, मग ते पंडिचत बी.एस. मठ गुरुजी असतील, दातार गुरुजी असतील, किश
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरमहाविकास आघाडीचे काय होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असतानाच आता संजय राऊतांनी इंडी आघाडी आणि मविआ संदर्भात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.
केंद्र सरकारने 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'च्या पुनर्रचनेची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा प्रभारी मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवार, दि. १० जून रोजज विधानपरिषदेत केली.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून टपोरीगिरी करण्यापेक्षा मराठीच्या मुद्द्यावर काहितरी ठोस पाऊले उचलावीत, असा सल्ला आमदार मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
साधू-संतांचा वेश परिधान करून लोकांना फसवणाऱ्या भोंदूबाबांविरोधात उत्तराखंड सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात होणाऱ्या कारवाईला 'ऑपरेशन कलानेमी' असे नाव दिले असून, लवकरच ती प्रत्यक्षात आम्लात आणली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. श्रद्धेच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री धामी यांनी दिलाय.
राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी "श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना" गैरव्यवहाराच्या विळख्यात सापडली आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यातच उघड झाला आहे. या प्रकरणाची मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
केंद्र सरकारने न्यायालयांमध्ये सरकारविरुद्ध सुरू असलेल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्यासाठी आणि अनावश्यक खटल्यांना आळा घालण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे.
घाटकोपर पश्चिम येथील श्री खंडोबा टेकडीवरील ३०० झाडे तोडणाऱ्या बिल्डरची चौकशी करून, दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजप आमदार राम कदम यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता.
आसामच्या गोलपारा येथे असलेल्या दुर्गा मंदिर संकुलातील देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहाबुद्दीन अली नामक धर्मांधाने दि. ९ जुलै रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मंदिरात प्रवेश करत मूर्तींची तोडफोड केली. आरोपी शहाबुद्दीन अली यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शासकीय योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला नवीन कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील. या कार्यप्रणालीत दोषी अधिकाऱ्यांचे केवळ निलंबनच नव्हे, तर शिक्षेचीही तरतूद असेल, अशी माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) गुरुवारी सकाळी ४.४ तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला.
शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी उचललेली पावले कधीकधी अशा क्रूरतेत बदलतात, ज्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही; असे मत मांडून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा काँग्रेस नेतृत्वास आणीबाणीवरून कोंडीत पकडले आहे.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी रामानंदी पंथाच्या प्राचीन पाताळपुरी मठात १५१ मुस्लिम महिला व पुरुषांनी गुरुदीक्षा घेतली. वाराणसी येथे यासंबंधीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा पातालपुरी मठातील जगद्गुरू बालकदास महाराज यांच्याकडून ही गुरुदीक्षा घेण्यात आली. अशी माहिती आहे की, दरवर्षी काही मुस्लिम बांधव येथे येतात आणि गुरुदीक्षा घेतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, गुरुपौर्णिमा हा गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे. यामुळे गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अधिक दृढ होते.
कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव
आधार आणि रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून समाविष्ट करण्याचा विचार करावा – न्यायालयाचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. याबद्दल स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी बहुप्रतिक्षित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक गुरुवार, १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले.
केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली.
'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४' गुरुवारी विधानसभेत बहुमताने संमत झाले. "नक्षलवाद आणि माओवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक ऐतिहासिक ठरेल. मात्र, त्याचा दुरुपयोग होणार नाही, यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडले जाईल.
बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘विशेष सघन पुनरावृत्ती’ (Special Intensive Revision) प्रक्रियेत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, असा महत्त्वपूर्ण संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या निवडणुकीत आधार ओळखपत्र वगळण्याच्या निर्णयाबाबत उत्तर देण्याचे निर्देश गुरुवार दि. १० जुलै रोजी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.
सर्वाना सुख-समृध्दी लाभो, तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळो’ अशी प्रार्थना करीत मत्स्येंद्रनाथांच्या चरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नतमस्तक झाले. निमित्त होते ते गुरूपौणिमेनिमित्त मलंगगडावर केलेल्या आरतीचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या आठ दिवसांच्या दौऱ्यात घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट दिली. त्यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही उपस्थिती लावली.
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधान परिषदेत केली.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्
शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. परिषदेत आमदार शिवाजीराव गर्जे यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादांबाबत लक्षवेधी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत विकासाचे आणि सहकार्याचे एक नवे धोरण आखले आहे. एकूणच चीनच्या आफ्रिकेतील विस्तारवादाच्या पार्श्वभूमीवर भारताची या खंडातील देशांना सहकार्याची भूमिका ही अधिक महत्त्वाची ठरावी.
बिहारमधील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी-रोहिंग्या मुस्लिमांना मतदार बनवण्यात आले आहे, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केली आहे. त्यांचा बिहारच्या निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकतो. निवडणूक आयोगाला निवडणुकीपूर्वी सर्व राज्यांमधील मतदारयादीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे, जेणेकरून बनावट मतदारांना मतदानापासून वगळता येईल.
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदान मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या शिक्षण सेवकांच्या आंदोलनाचे पडसाद काल विधिमंडळात उमटले. स्वाभाविकपणे, विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि सडेतोड उत्तराने मविआच्या दुटप्पी राजकारणाचा बुरखा फाडला.
अफगानिस्तानमध्ये तालिबानी राजवटीत मुली-महिलांवर जे अमानवी निर्बंध लादले गेले, ते जगजाहीर आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने नुकतेच तालिबानचे सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुनजादा आणि मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्यावर महिला आणि मुली यांच्याविरोधात दुर्व्यवहार, अमानवी वर्तनाविरोधात अटक वॉरंट काढले. यावर तालिबानी सरकार प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने याने म्हटले की, "इस्लामिक अमिरातच्या नेतृत्वाअंतर्गत इस्लामिक ‘शरिया’च्या पवित्र कायद्याच्या आधारे अफगाणिस्तानमध्ये अद्वितीय न्याय स्थापित केले
कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी कप्स कॅफे नावाच्या कॅफेचे उद्घाटन केले होते. हल्लेखोरांनी कॅफेवर नऊ गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोरांनी या हल्याचे व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ देखिल व्हायरल होत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
सार्या जगाला अनाहूत सल्ले आणि सूचना देणार्या अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील दोषांची चर्चा आजवर जाहीरपणे केली जात नव्हती. यामागे अमेरिकेचा राजकीय दबदबा आणि व्यावसायिक लाभाचे समीकरण होते. पण, आधी ‘लॉकहीड मार्टिन’च्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानाने आणि नंतर ‘बोईंग’च्या ‘बी ७८७ ड्रीमलायनर’ या दोन विमानांनी अमेरिकी तंत्रज्ञानातील दोष आणि उणिवा उघड केल्या आहेत. अमेरिकेच्या तांत्रिक प्रभुत्वाला छेद देणार्या या घटना आहेत.
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी...