सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व प्रम
Read More
मान्सूनच्या आगमनाला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईची ‘तुंबई’ झाली. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना फटका सहन करावा लागला.
नरिमन पॉईंट येथील प्राईम लोकेशन असणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या जमिनीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून कार्यालयांच्या उभारणीसाठी जमिनीची विनंती करण्यात आली होती. ही विनंती एमएमआरसीएलने मान्य केली असून हा भूखंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कार्यालये उभारणीसाठी देण्याबाबत एमएमआरसीएलने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
"उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे", असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी केला.नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे साथीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील आता प्रत्युत्तर देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली असून, या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे.
अपुरे पडणारे मंत्रालय आणि कामाचा प्रचंड व्याप या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंटच्या समुद्र किनारी उभी असलेली एअर इंडियाची आलिशान इमारत विकत घेण्यासाठी राज्य सरकारचे सुरु असलेले प्रयत्न फलद्रुप होताना दिसत आहेत. सरकार आणि एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडमध्ये इमारतीच्या किमतीवरून एकमत झाले असून लवकरच या इमारतीची मालकी राज्य सरकारकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आता दर शनिवारी आणि रविवारी मल्टिमीडिया अॅण्ड साऊंड शोचा नुकताच शुभारंभ झाला आहे. तसेच मुंबईतही ठिकठिकाणी सुशोभीकरण प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. तेव्हा, या सुशोभीकरण प्रकल्पाचे एकंदर स्वरुप जाणून घेण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच...
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट ते कफ परेड कनेक्टरला स्थानिक मच्छीमारांनी विरोध दर्शवला आहे. या पुलामुळे स्थानिकांच्या मासेमारी नौका नांगरण्याचे ठिकाण आणि स्थानिक वस्तीवा बाधा पोहचू शकतो, असा आक्षेप स्थानिकांनी नोंदवला आहे. त्यामुळे कफ परेड येथील स्थानिक कोळी समाजाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने या प्रकल्पा विरोध केला आहे.
कोकण किनारपट्टीला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे-पालघर या जिल्ह्यांनाही तडाखा दिला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले हवाई दल.
नरिमन पाॅईंट परिसरात 'कांदळवन कक्षा'च्या पथकाची गस्त
अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु!
ईस्टर्न एक्स्प्रेस वे मुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी होणारा कोस्टल रोडच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे.