नरीमन पॉईंट परिसरात बँकेला भीषण आग!

    25-Jun-2020
Total Views | 47
fire_1  H x W:


अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु!

मुंबई : मुंबईत आज पहाटेच्या सुमारास मुंबईतली नरीमन पॉईंट परिसरातील एका बँकेला आग लागली. सकाळची वेळ असल्यामुळे बँक बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.


मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरातील ‘बँक ऑफ बहरीन अँड कुवैत’च्या इमारतीला गुरूवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानुसार अगिनशमन दल ही आग विझविण्याच प्रयत्न करत आहेत. बँक बंद असल्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली तसेच यात किती वित्तहानी झाली याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121