(Maharashtra Weather Update) राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ जुलै आणि ५ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read More
ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.
ठाण्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातल्या बऱ्याच भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसात विमानसेवादेखील विस्कळीत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले असून या ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. मात्र रेल्वे रुळावर उशीराने धावत होती. सायंकाळी देखील दोन्ही मार्गावरील वरील रेल्वे उशीराने धावत होती. त्याचा परिणाम कर्जत ते ठाणे, कसारा ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पाहता प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तुलसी तलावा पाठोपाठ भातसा तलाव देखील भरले आहे. तसेच तानसा ९४.२७ टक्के तर विहार ९६.७५ टक्के भरल्याने लवकरच मुंबईकरांच्या डोक्यवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट निघून जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण ५५ टक्क्यांहुन अधिक पाणीसाठा आता असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. तसेच, नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे.बुधवारी सकाळपासुनच सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वृक्षांची पडझड होऊन वाहनांची वाताहत उडाली. शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने गुरुवारी शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
येत्या २४ तासात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र - गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगसाठी गेलेले ३५ विद्यार्थी बेपत्ता झाले होते. हे विद्यार्थी आयआयटीचे असून ते सुरक्षित असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनालीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेथील परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराच्या वाहत्या पाण्यात चक्क एक बस आणि ट्रक वाहून गेले आहेत.
येत्या २४ तासांमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून तिन्ही राज्यांना सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याने दिली आहे.
यंदाच्या मौसमामध्ये राज्यात पावसाने अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे आणि नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत.
शहरातील रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा या मंदावल्या आहेत.
राज्यात विविध भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या ४८ तासांमध्ये मुंबईसह पालघर, रायगड, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच येत्या दोन दिवसांमध्ये देशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याने वर्तवले आहे.
दरम्यान पावसामुळे अधिवेशन स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे विरोधकांकडून पुन्हा सरकारला यासाठी धारेवर धरले जात आहे.
गेल्या २४ तासांमध्ये संपूर्ण भारतामध्ये मेघालयातील चेरापुंजीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली असून आता नेहमीप्रमाणे मुंबई यावर्षी देखील तुंबापुरी झाली आहे.