एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! शिवसेनेकडून ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट

    05-Jul-2025
Total Views |


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असा नारा दिल्याने उबाठा गटासह विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.





शुक्रवार, ४ जुलै रोजी गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमातील भाषणादरम्यान त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.

त्यानंतर आता शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. शिवसेनेच्या च्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून याला 'एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू' असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' अशी घोषणा देताना दिसतात.