मुंबई : मीरारोडच्या परराज्यातील हिंदी भाषिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री यागेश कदम यांनी हॉटेल मालकाला सज्जड दम देताना म्हणाले की, “महाराष्ट्रात राहतोस तर तूला मराठी बोलता यायलाच हवी, येत नाही वैगरे महाराष्ट्रात एकून घेतले जाणार नाही. येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न कर.” असा दम मंत्री कदम यांनी दुकान मालकाला दिला आहे.
मंत्री कदमांचे मनसे कार्यकर्त्याना आवाहन
मनसे कार्यकर्त्यांनी मीरारोडच्या एका हॉटेल मालकाला मराठी न बोलण्याच्या वादातून मारहाण केली होती. या घटनेचा निषेधार्थ मीरा भाईंदर परिसरातील हॉटेल व दुकानदारांनी गुरुवारी बंद पाळला होता. याच पाश्वभूमीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दुकान मालकाला सज्जड दम देत, मनसे कार्यकर्त्यांना सांगितले की, “कोणीही कायदा हातात घेऊ नये, असा हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” असे कदम म्हणाले.
सोशल मिडीयात व्हिडिओ व्हायरल
“महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली पाहिजे”? असे मनसे कार्यकर्त्यांनी विचारताच यावर हॉटेल मालकाला म्हणतो, “सर्व भाषा बोलल्या पाहीजेत.” हॉटेल मालकाचे हे उत्तर एकून मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या थोबाडात लगावत मारहाण केली. आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल होत नेटकऱ्यामध्ये चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.