अक्षय्य तृतीया, हिंदु धर्मातील एक पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करुन संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. देवाची पूजाही केली जाते. दाराला सुंदर तोरण घराबाहेर सुबक रांगोळी काढली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवे कार्य, वस्तू खरेदी केली तर ते शुभ मानले जाते. अन्नदान करणे सुद्धा पुण्याचे मानतात. या दिवशी सोने खरेदी कराण्याचाही खास मुहूर्त असतो. सोने खरेदी करायचा मुहूर्त यंदाच्या अक्षय्यतृतीयेला सकाळी ५ वाजून ४१ मिनिटे ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत होता. शुभ चौघडीया मुहूर्त सकाळी ५.४१ ते ९ आणि १०.३९ ते दुपारी १२.१८ पर्यंत होता.
असा करा आमरस पुरीचा बेत...
या खास मुहूर्तावर जर तुम्हाला काही खास बेत करायचा असेल, तर आंब्याच्या रसाच्या खुसखुशीत पुऱ्या हा उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पिठात रवा, मीठ, तूप मिसळा आणि आंब्याच्या रसात पिठीसाखर घालून पीठ मळा. काही वेळाने लाटून पुरी तळा. ही पुरणाची चविष्ट व खास पुरणपोळीला पर्याय देणारी रेसिपी आहे.