Chhaava Box Office Collection Day 19: छावा एतिहासिक चित्रपटाने बॉलिवूडमध्ये रचला नवा इतिहास, तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल 'इतकी' कमाई!
04-Mar-2025
Total Views |
मुंबई : अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत असून, तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाले असले, तरी छावाच्या यशासमोर ते अपयशी ठरत आहेत. काल पहिल्यांदाच या चित्रपटाने सिंगल डिजिटमध्ये म्हणजेच ८.५ कोटींची कमाई केली. मात्र, तरीही आज १९व्या दिवशी हा चित्रपट पुन्हा दमदार कमाई करत आहे. तिसऱ्या आठवड्यातही छावाचा वेग मंदावताना दिसत नाही, ज्यामुळे आता त्याच्या एकूण कमाईचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
भारतात ५०० कोटींच्या उंबरठ्यावर, जागतिक स्तरावर ६२५ कोटी पार!
या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ४६७ कोटींची कमाई केली असून, लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करेल. तर, जागतिक स्तरावर हा चित्रपट ६२५ कोटींच्या कमाईसह एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, फक्त १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या काही आठवड्यांतच विक्रमी नफा कमावला आहे.
शेवटचा टप्पा – ६०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश?
आता छावाचा पुढील टप्पा ६०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवण्याचा आहे. चित्रपटाच्या सुरूवातीच्या खेळांसाठी संथ गती असली, तरी संध्याकाळपर्यंत प्रेक्षकांचा ओघ वाढतो. ४ मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना असल्यामुळे कमाईवर थोडासा परिणाम होऊ शकतो, तरीही चित्रपट ८ कोटींपेक्षा अधिक कमाई करेल, असा अंदाज आहे.
विकी कौशलचा छावा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक नवा मापदंड ठरत आहे. मोठ्या प्रमोशनशिवायही छावाने जे यश मिळवले आहे, ते अनेकांसाठी धडा ठरणार आहे.