शेअर बाजारात पुन्हा घसरण, बँकांच्या शेअर्सनी तारले

ऑटो आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

    04-Mar-2025
Total Views | 39
market
 
 
मुंबई : जागतिक बाजारपेठेतल्या धक्यांमधून शेअर बाजार अजूनही सावरायला तयार नाही. मंगळवारीही ९६ अंशांनी घसरत बाजार ७२,९८९ अंशांवर थांबला. निफ्टीमध्येही घसरण होत, ३६ अंशांनी खाली येत २२,०८२ अंशांवर निर्देशांक थांबला. प्रामुख्याने ऑटो आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर या घसरणीत बँकांच्या शेअर्सनी मात्र बाजाराला सावरले.
 
मंगळवारी घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे जागतिक अस्थिरतेचा प्रभाव भारतीय कंपन्यांवर दिसून येतो आहे. याउलट एसबीआय, बीपीसीएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला सावरले.
 
बाजार तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक संकटांचा भारतीय बाजारावर परिणाम होत असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेची रुळावर येत असलेली घडी बाजाराला आधार देत आहे. त्यामुळे बाजार सावरतोय असे तज्ज्ञांचे मत आहे. आता पुढील काळात बाजारावर कसे पडसाद उमटतात हे बघणे महत्वाचे ठरेल.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121