१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

    07-Jan-2025
Total Views |
Fastag

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व वाहनांना फास्ट-टॅग ( Fastag ) अनिवार्य करण्याचा मुख्य निर्णय घेण्यात आला. दि. ७ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही विशेष निर्णय घेण्यात आले. राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले.

राज्यामध्ये फास्ट टॅग हा आणण्यात आला, परंतु बहुतेक माणसे ही फास्टटॅग न वापरताच गाडी चालवतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १ एप्रिलपासून सर्व वाहनांवर फास्टटॅग अनिवार्य केले आहे. प्रत्येक टोलनाक्यांवर एक कॅशकाऊंटरदेखील ठेवले जात होते. ज्यांच्याकडे फास्टटॅग नाही अशा वाहनांना त्यामार्फत टोल भरणे भाग होते. परंतु आता फक्त फास्टटॅगच्या मार्फतच टोल भरणे अनिवार्य केले आहे. एप्रिल महिन्यापासून सर्व टोलनाक्यांवर फक्त फास्टटॅगच्या स्वरुपात टोल आकारला जाणार.