माणसांच्या जागी AI Robot करणार नोकरी! 'या' कंपनीचा दावा

    06-Jan-2025
Total Views |

openai

वॉशिंग्टन डीसी : माणसांच्या जागी एआय रोबोट काम करणार, ही आता दंतकथा राहिली नसून, तुमच्या आमच्या जगातलं वास्तव होणार आहे. २०२५ या वर्षामध्ये लवकरच माणसांच्या जागी एआय रोबोट काम करणार असल्याची माहिती OpenAI या कंपनीचे सीइओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ही कल्पना एखाद्या विज्ञान कथेसारखी वाटत असली तरी, लवकरच ही कल्पना सत्यात उतरणार आहे.
 
आपल्या ब्लॉगमध्ये सॅम यांनी म्हटले की Open AI ची सुरूवात ९ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळेस AGI म्हणजेच आर्टिफिशिल जनरेटिव इंटेलिजेंस वर काम होऊ शकतं, तसेच मानवजातीच्या इतिहासात यामुळे आमूलाग्र बदल होऊ शकतो. याची निर्मिती कशी करायची? याचा जगावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. ३० डिसेंबर २०२२ रोजी ChatGPT हे अॅपलीकेशन आमच्या कंपनीने लँच केलं. यामुळे एआयच्या क्रांतीला सुरूवात होईल हे आम्ही ओळखलं होतं, परंतु ती वेळ इतक्या लवकर येऊन ठेपेल याची आम्हाला कल्पना नव्हती. चॅटजीपीटीच्या आगमनामुळे जगभरात एका अश्या प्रगतीची सुरूवात झाली, ज्याचा विचार सुद्धा आम्ही करू शकलो नाही. आम्हाला आशा होती त्याप्रमाणेच आम्हाला यश लाभलं.

AI Robot करणार नोकरी!
आपल्या कंपनीच्या परिवर्तनशील धोरणवर भाष्य करताना सॅम म्हणाले की आमची दृष्टी बदलली नसून आमची रणनिती बदलणार नाही. नजीकच्या काळात एआयचे अजेंट वर्कफोर्समध्ये सामील होणार आहेत. यामुळे कंपनीच्या आऊटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन येणार आहे. लोकांना हा विज्ञानाचा चमत्कार वाटत असला तरी थोड्याच दिवसांमध्ये ही गोष्ट सत्यात उतरणार आहे.