विकसित भारतासाठी ग्रामीण भागाचा विकास महत्त्वाचा : नरेंद्र मोदी
नवी दिल्लीमध्ये ‘ग्रामीण महोत्सव २०२५’चे उद्घाटन
05-Jan-2025
Total Views |
मुंबई : नवी दिल्लीमधील भारत मंडपम्मध्ये शनिवार, दि. ४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी ‘ग्रामीण भारत महोत्सव-२०२५’चे उद्घाटन केले. ‘ग्रामीण भारत महोत्सव’ हा वित्तीय सेवा विभाग आणि नाबार्ड यांचा संयुक्त उपक्रम असून, देशातील ग्रामीण भागातील जनतेचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
“पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीमधील भारत मंडपम्मध्ये ‘ग्रामीण भारत महोत्सव-२०२५’चे उद्घाटन केले. देशातील जेवढी गावे विकसित होतील, विकसित भारतात त्यांची भूमिकाही अधिक व्यापक असेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितीतांना संबोधित करताना म्हटले. तसेच, “ज्यांना कोणीच विचारत नाही, मोदी अशांची पूजा करतात,” असेही पंतप्रधानांनी म्हटले. देशातील ग्रामीण भागाचा विकास करत, ग्रामीण भागातील जनतेला एक सन्मानपूर्वक चांगले जीवन देणे हीच माझ्या सरकारची प्राथमिकता असून, यासाठीच माझ्या सरकारने अनेक मूलभूत सुविधांचा विकास करणार्या योजना सुरु केल्या असल्याचेदेखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
‘ग्रामीण महोत्सव-२०२५’ मध्ये आहे काय?
‘ग्रामीण महोत्सव-२०२५’मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची ग्रामीण भागाच्या विकासाबाबत मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत. तसेच, कार्यानुभव शिबिरांचेदेखील आयोजन केले आहे. देशातील हातमाग, हस्तकला अशा १८०पेक्षा जास्त कारागिरांच्या वस्तू या ठिकाणी घेता येणार आहेत.}