गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा मोठा निर्णय
03-Jan-2025
Total Views |
मुबई : राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी हे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे, परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
राज्यातील गौण खनिजांचे नियमन अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार देण्यामुळे वाळू उत्खननासंबंधी अनियमितता कमी होईल, तसेच वाळू माफियांवर कठोर कारवाई करता येईल. या निर्णयामुळे सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल.
हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे, आणि जिल्हा प्रशासनांना यासंबंधी आवश्यक त्या सूचना देऊन परिपत्रक महसूल विभागाने जारी केलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे धोरण
राज्यातील वाळू माफियांवर प्रभावीपणे नियंत्रण आणणे.
गौण खनिज उत्खनन प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करणे.