आमचा पक्ष रालोआसोबतच, केंद्रीय मंत्री आणि जदयु नेते राजीव रंजन यांचे स्पष्टीकरण
02-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : (NDA) जनता दल युनायटेड (जदयु) राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच (रालोआ) आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव रंजन उपाख्य ललन सिंह यांनी गुरूवारी दिले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी आघाडीचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) लालू प्रसाद यादव यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी गुरुवारी आपला पक्ष रालोआ सोबत असल्याची पुष्टी दिली आहे. "आमचा पक्ष रालोआसोबतच आहे. लोक काय म्हणतात त्यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; लोकांना जे हवे ते म्हणू शकतात", असे सिंह यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार यांच्याविषयी राजकीय वर्तुळात विशिष्ट चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा रालोआची साथ सोडणार, अशी ही चर्चा आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यामुळे अधिकच संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.