भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका जन्मस्थळी अवैध बांधकामावर प्रशासनाचा हातोडा

    11-Jan-2025
Total Views |

Dwarka
गांधीनगर : गुजरातमधील देवभूमी द्वारकामध्ये (Dwarka) राज्य सरकारने पुन्हा एकदा बुलडोझरची कारवाई केली आहे. किनारपट्टी भागातील शेकडो एकर जमीन ही सरकारी मालमत्तेची आहे. एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असणारी घरे व इतर धार्मिक आणि व्यावसायिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत. आता ही बांधकामे हटवण्यात आली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
याप्रकरणी राज्य सरकारकडून अधिकृत माहिती मिळावी अशी आशा आहे. परंतु एका अहवालानुसार, सुमारे ४० ते ५० अवैध घरे आणि व्यवसायिक बांधकाम पाडण्यात आली आहेत. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मोहिमेची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
 
हर्ष संघवी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, द्वारका ही देशभरातील कोट्यवधी लोकांसाठी श्रद्धास्थान आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पावन झालेल्या भूमीवर कोणतेही अवैध बांधकाम ठेवणार नाही. आपली श्रद्धा आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी आपली आहे. गुजरातमधील भूपेंद्रभाई पटेल सरकारने अवैध अतिक्रमणाबाबत कोणतेच पाऊल उचलले नाही.
 
 
 
या संबंधित कारवाईनंतर आता द्वारकामध्ये भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. त्याठिकाणी गुजरात पोलिसांचाही फौजफाटा आहे. मात्र, मंदिरात काहीही वाईट घडणार नाही याची मात्र काळजी घ्यावी अशी ताकीद देण्यात आली आहे.
 
या कारवाईमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांसह एकूण एक हजार पोलीस दल सहभागी होणार आहेत. यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याआधीच सर्व तयारी करून ठेवली होती. कारवाईदरम्यान, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवण्यात आली आहे. मात्र ही संपूर्ण प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. बांधकामांची संख्या लक्षात घेता काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
द्वारका हे भारतातील पश्चिमेकडील भागातील टोक आहे. देवभूमी द्वारकेपासून केवळ २ किमी अंतरावर असलेल्या छोट्या बेटाजवळ आहे. या बेटावर हिंदूंच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असणारे श्रीकृष्णाचे मंदिर आहे.