मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा १' चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच करोडोंची कमाई केली आहे. २०२४ मधील एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा १' हा चित्रपट बहुप्रतिक्षित आहे. या चित्रपटाची, गाण्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अधिकच चर्चा सुरु झाली होती. अशातच आता चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत.
देवरा १ च्या निमित्ताने अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खानने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाच्या शोसाठी देशभरात 7 लाख 34 हजार 761 तिकिटे विकली गेली आहेत. ज्यामधून चित्रपटाने रिलीजपूर्वीच 18.78 कोटींची कमाई केली आहे. तर तेलगू भाषेत चित्रपटाची 7 लाख 19 हजार 608 तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग झाली असून या चित्रपटाची 16 हजार 3024 तिकिटे हिंदीत विकली गेली आहेत. रिलीजपूर्वीच जर का इतकी कमाई झाली असेल तर नक्कीच हा चित्रपट पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई करु शकतो. 27 सप्टेंबरला देशभरात ‘देवरा १’ प्रदर्शित होणार आहे.