भारताला सेमीकंडक्टर पॉवरहाऊस बनवणार; सेमीकॉन २०२४ परिषदेत पंतप्रधानांचा निर्धार
11-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशांतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाला सेमीकंडक्टर पॉवरहाऊस बनवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर देताना जगातील प्रत्येक उपकरणात भारतात बनलेली चिप असेल हे आमचे स्वप्न आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदींनी केला. तसेच, अर्थव्यवस्थेसाठी पुरवठा साखळीतील लवचीकता महत्त्वाची असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी भागात सेमीकॉन २०२४ परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड-१९ महामारीने पुरवठा साखळीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी पावले उचलण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे. पुरवठा साखळी लवचिकता खूप महत्त्वाची असून भारत अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये हे निर्माण करण्याचे काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सेमीकंडक्टर हे स्मार्टफोनपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व गोष्टींचा आधार असल्याचे मोदी म्हणाले. सप्लाय चेन कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची असून भारत अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये हे निर्माण करण्याचे काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताचे सुधारणावादी सरकार, स्थिर धोरणे आणि सेमीकंडक्टर उत्पादनात गुंतवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या बाजारपेठेबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले.