बांगलादेशी हिंदूंच्या सरकारी नोकऱ्यांवर गदा, तब्बल ४९ शिक्षकांना राजीनामा देण्यास जबरदस्ती

    01-Sep-2024
Total Views |

49 Bangladeshi Hindu Resign 
 
 
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा झाल्यानंतर युनूस खान यांचे सरकार स्थापन करण्यात आले. मात्र बांगलादेशी नवनिर्वाचित सरकार आणि जमात ए इस्लाम या कट्टरपंथी संस्थेने बांगलादेशी हिंदूंच्या सरकारी नोकऱदारांना हटवले आहे. सरकारी नोकऱ्यांवर गदा आणण्याचे काम बांगलादेशी सरकारने केले आहे. आतापर्यंत एकूण ४९ बांगलादेशी हिंदू शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले आहे.
 
याप्रकरणात बेकरगंज या सरकारी महाविद्यालयातील प्राचार्या शुक्ला रानी हलदर यांना राजीनामा देण्यास जबरदस्ती केली आहे, बांगलादेशी प्रसारमाध्यमानुसार, ५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी जमावाने प्राध्यापकांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा देण्याची मागणी केली. यावेळी त्यांना विविध प्रकारे धमक्या देण्यात आल्या. त्यावेळी प्राचार्यांनी एका कोऱ्या कागदावर 'मी राजीनामा देत आहे', असे लिहून त्यांना आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश नॅशनल पक्षातील विद्यार्थी संघटनेतील युवकांनी प्राचार्यांना आपल्या प्राचार्य पदावरून राजीनामा द्या अशी जबरदस्ती केली आहे. दरम्यान बांगलादेश नॅशनल पक्ष हा खलिदा झिया यांचा पक्ष असून त्या शेख हसिनांच्या विरोधक आहेत.
 
 
 
याप्रकरणात प्राचार्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अनियमित उपस्थिती आणि इतर गैरव्यवहारांचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही आंदोलकांनी त्यांच्या कार्यालयात त्यांना विविध प्रकारे धमक्या देत राजीनाम्याची मागणी करत राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.
 
यावेळी अंतिम क्षणी संबंधित प्राचार्यांनी एका कोऱ्या कागदावर दुपारी २ वाजताच्या सुमारास 'मी राजीनामा देत आहे' असे लिहून राजीनामा सुपूर्द केला. यावेळी प्राचार्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, यावेळी माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले, याचसोबत इतर बाहेरील आंदोलकांचा यामध्ये समावेश होता, अशा प्रचार्या म्हणाल्या आहेत.