लैंगिक अत्याचार केलेल्या शिक्षकाला पुन्हा नोकरीची संधी दिली, त्याच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर...
24-Aug-2024
Total Views |
पुणे : पिंपरी चिंचवड येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड शाळेतील विद्यार्थींनींसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोपी हा शाळेतील शिक्षकच आहे अशी माहिती सांगण्यात आली. तसेच त्याच शिक्षकाने याआधी विद्यार्थींनींवर अत्याचार केले होते. याप्रकरणात ७ जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शाळेा पीटी शिक्षक हा मुख्य आरोपी आहे. इतर अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी, मुख्यध्यापकांचा समावेश आहे. याप्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संबंध खासगी शाळा आणि शिक्षकांशी जोडला गेलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पीटी शिक्षकावर अनेकदा पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होते. त्यांच्या लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तो शिक्षक तुरूंगातही गेला होता.
पोलिसांनी सांगितले की, शिक्षा भोगून आल्यानंतरही शाळेने त्या पीटी शिक्षकाला पुन्हा शाळेत नोकरी दिली. शाळेचे मुख्यद्यापक आणि विश्वस्तांसह एकूआता पुन्हा एकदा शिक्षकाने तेच पाऊल उचलले असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे. याप्रकरणात एकूण सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तसेच पीटी शिक्षक केवळ पीडितेला चुकीचा स्पर्श करत होता एवढंच नाहीतर तिला धमकावले देखील होते. पीटीचा शिक्षक पीडितेची शाळेच्या शौचालया बाहेर वाट पाहत थांबायचा.
पीटी शिक्षकाने पीडितेवर केलेल्या अत्याचाराची माहिती पीडितेने तिच्या कुटुंबियांना दिली. यावेळी पीडितेच्या वडिलांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली. याप्रकरणी संबंधित आरोपीवर पॉक्सो कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.