पुण्यात पावसाचा हाहाकार! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पंचनामे करण्याचे आदेश

    25-Jul-2024
Total Views | 55
 
Ajit Pawar
 
पुणे : पुण्यात पावसाचा हाहाकार माजला असून संपूर्ण पुणे परिसर पाण्याखाली आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या एकता नगर परिसरात त्यांनी केली. यावेळी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
 
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकांच्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं आहे. मी इथल्या आयुक्तांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे. त्यानुसार राज्य सरकार आणि महापालिका मिळून त्यांना सहकार्य करण्यात येईल."
 
 हे वाचलंत का? -  ठाण्यात पावसाचे घमासान! तलावांच्या शहराचे झाले तळे
 
"मागच्या वेळी खडकवासला धरणातून जास्तीचं पाणी सोडलं जात असतानाही आमच्याकडे ते कधीच येत नव्हतं. परंतू, यावेळी पाणी इकडे आलेलं आहे, असं इथल्या स्थानिक नागिरकांचं म्हणणं आहे. पाणी ओसरल्यावर आम्ही जलसंपदा विभाग, महापालिका आणि अधिकारी इथली पाहणी करतील. नदीच्या बाजूला भराव दाबल्या गेलाय का आणि त्यामुळे पाणी वहन करण्याची क्षमता कमी झाली का, याची शाहानिशा केली जाईल. त्यात काही चुकीचं आढळल्यास ते दुरुस्त करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "संध्याकाळी ६ पर्यंत खडवासला धरणातील पाणी ५० टक्क्यांपर्यंत आणायचं आहे, जेणेकरून रात्री पाऊस पडल्यास त्यात पाणी साठवता येईल. इथून पुढे ज्या सखल भागात पाणी साचतं तिथे सर्वात आधी अलर्ट करण्यात येईल," असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121