एल अँड टी फायनान्स लिमिटेडतर्फे मुंबईत 'द कमप्लीट होम लोन' योजनेचा शुभारंभ

कमप्लीट होम लोन" ही ग्राहकांच्या सेवेसाठी संपूर्ण डिजिटल प्रक्रिया, समर्पित रिलेशनशिप मॅनेजर, आणि होम डेकोरसाठी वित्तसहाय्य देते

    06-Jun-2024
Total Views |

L & T Finance
 
 
मुंबई: रिटेल फायनान्स कंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) मुंबईतील ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'द कमप्लीट होम लोन' ही नवीन वित्तसहाय्य योजना बाजारात आणली आहे. या योजनेत ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व मदत दिली जाणार आहे. 'द कमप्लीट होम लोन' मध्ये होम डेकोरेशनसाठी वित्तसहाय्य पुरविले जाणार आहे. सदर वित्तसहाय्य ग्राहकांना डिजीटल प्रक्रियेव्दारे दिले जाणार असून ग्राहकांना मदत करण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरही राहणार आहे.
 
आपल्या राहण्याच्या आरामदायी जागेसाठी आवश्यक असे फर्निशिंग, या फर्निशिंगच्या निर्मितीसाठी ग्राहकांना लवचिकता आणि सुविधा प्रदान करणे हे होम डेकोर फायनान्सचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डिजिटाइज्ड प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची मदत कर्ज मिळवण्याचा प्रवास आणखी सुलभ करते. त्याचबरोबर ग्राहक समर्पित रिलेशनशिप मॅनेजर हा सुटसुटीत आणि समाधानकारक अनुभवाची खात्री देताना संपूर्ण कर्ज प्रक्रियेदरम्यान ग्राहकांसाठी एक संपर्क बिंदू म्हणून कार्य करतो.
 
आपल्या या आगळ्यावेगळ्या योजनेचा प्रचार करण्यासाठी कंपनीने तीन नवीन टीव्ही जाहिरातींचे प्रसारण सुरु केले आहे. Kum Nahi, Complete’ या टॅगलाइनसह या जाहिरातीत अतिशय चतुराईने विनोद आणि संबंधित परिस्थितींची गुंफण करत उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलेले आहे. पहिली टीव्ही जाहिरात 'होम डेकोर फायनान्स' काय आहे, यावर भर देते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या जाहिरातीत 'डिजिटाइज्ड प्रोसेस' आणि 'डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर' या वैशिष्टांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.
 
नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एलटीएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुदिप्त रॉय (Sudipta Roy) म्हणाले,'आमच्या ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘द कमप्लीट होम लोन’ ही वित्तयोजना सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अतिशय लवचिक असलेली ही योजना ग्राहक केंद्रित आहे. ही योजना प्रामु ख्याने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली असून आमच्या नावीन्यपूर्णतेबाबत असलेली वचनबद्धताही प्रकट कर ते. प्रत्यक्ष बाजारपेठेत केलेल्या सूक्ष्म संशोधनाद्वारे आम्ही ग्राहकांच्या अपूर्ण गरजा शोधून काढल्याने आम्हाला या नवीन योज नेची पुनर्कल्पना करता आली आणि गृहवित्तसाठी एक परिपूर्ण अशा पर्यायावर लक्ष केंद्रीत करता आले आहे.
 
आमची ही योजना म्हणजे वित्तपुरवठ्याच्या बाबतीत बाजारातील सर्वात उत्तम पर्याय सादर करणे तसेच आमचे मौल्यवान ग्राहक, भागीदार आणि भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यावर आमचे सतत लक्ष केंद्रित असल्याचा पुरावा आहे. आमच्या नवीन टीव्ही जाहिरातींचा उद्देश ब्रँडची दृश्यमानता आणखी वाढवणे तसेच आमच्या योजनेबाबत ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधणे हा आहे. या जाहीराती प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील आणि त्यांच्यात गृहकर्जाबाबत अधिक सुलभतेची भावना निर्माण होईल, याची आम्हाला खात्री आहे.'
 
एलटीएफच्या अर्बन फायनान्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गरयाली (Sanjay Garyali) म्हणाले, 'मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. ‘द कमप्लीट होम लोन’ योजना सुरु करत आम्ही प्रामुख्याने बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पांत तसेच तयार मालमत्तांसाठी गृहकर्जाच्या शोधत असलेल्या नवीन गृह खरेदीदारांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. ग्राहकांचा पुर्वइतिहास, त्यांची वतर्णुक समजून घेत ग्राहकांना सर्वांगीण समाधान प्रदान करण्याच्या उद्देशाने पूर्णपणे संशोधन आधारित ‘द कमप्लीट होम लोन’ योजना सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो.
 
अनेक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त पेपरलेस प्रक्रिया, दस्तऐवजीकरणाची अतिशय सोपी सुटसुटीत पध्दत आणि सेवांबाबत सर्वोत्तम मानके यासारखी महत्त्वाची मूल्यवर्धित वैशिष्ट्ये या योजनेत असून जोडीला आकर्षक व्याजदरही आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही तयार केलेली ही योजना ग्राहकांना त्यांच्या घराच्या सजावटीच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यात सतत मदत करेल. आमच्या ग्राहकांना आरामदायी जीवनासाठी हवी असलेली लवचिकता तसेच नानाविध सुविधा प्रदान करण्यात आम्ही या योजने व्दारे आणखी सक्षम होऊ.'
 
प्रचार मोहिमेचा भाग म्हणून, कंपनी आयपीएलसाठी सह-प्रस्तुत प्रायोजकांपैकी एक आहे.आयपीएल सामन्यांदरम्यान जिओ सिनेमा (Connected TV) वर या योजनेच्या टीव्ही जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. निवडणूकपूर्व निकालांदरम्यान आणि मतदान मोजणीच्या दिवशी कंपनी प्रमुख वृत्तवाहिन्यांवर आपल्या जाहिरातींचे प्रसारण करणार आहे. कंपनीने विविध सोशल मीडिया चॅनेलवरसुध्दा डिजिटल प्रसारण मोहीम सुरू केलेली आहे.याव्यतिरिक्त, एलटीएफ ब्रँड अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी होर्डिंग्ज, विमानतळ परिसर, बिल्डरांशी सहयोग आणि मुंबई आणि भारतातील इतर शहरांमधील प्रमुख मेळावे, प्रदर्शनातून प्रचार केला जात आहे.