लोकसभेचा प्रचार शिगेला! दिवसभरात केंद्रीय मंत्री, भाजप नेत्यांच्या प्रचार रॅली सभांचा धडाका!

    16-May-2024
Total Views |
 
BJP Leaders
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याला आता थोडाच अवधी शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिवसभरात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. दरम्यान, १६ मे रोजी कुणाच्या कुठे सभा आहेत, याचा आढावा घेऊया.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी ३ सभा आहेत. नाशिकमधील मनमाड येथे दुपारी २.३० वाजता त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर मुंबईतील कुर्ला येथे सायंकाळी ७ वाजता त्यांची दुसरी जाहीर सभा होईल. तसेच रात्री ८.१५ वाजया मुलूंड येथेही त्यांची सभा होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  चोराच्या मनात चांदणं! बॅगवरील टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांना टोला
 
याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असून त्यानंतर त्यांचे एक संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले आहे. मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे.
 
याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याही चार लोकसभा मतदारसंघात बैठका होणार आहेत. दक्षिण मुंबईमध्ये त्यांची उद्योगपतींसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर उत्तर मध्य मुंबईत ते शिक्षणतज्ञ व व्यवसायिकांसोबत संवाद साधतील. दुपारी ते उत्तर पूर्व मुंबई हिरे व्यापारी आणि व्यापारी संघटनांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर उत्तर मुंबई मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  "खिडीतून मजा बघणारं घरकोंबडं..."; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
 
भारताचे पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांचे चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान आणि संवाद होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पालघर लोकसभा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात माधवी लता यांच्या जाहीर सभा होणार आहेत.