कोस्टल रोड सी लिंक जोडण्याची मोहीम फत्ते !

दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन

    15-May-2024
Total Views |

coastal road 2


मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी : 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने(कोस्टल रोड)   बुधवार, दि. १५ मे रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली. पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. उर्वरित कामे पूर्ण करून लवकरच मुंबई किनारी रस्त्याचा (कोस्टल रोड) पुढील टप्पा सुरू होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. 

पहाटे ३ वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसविलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे ६ वाजून ७- मिनिटांनी अडीच हजार मेट्रीक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली. बुधवारी बसविण्यात आलेली तुळई ही आधी बसवलेल्या पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर आहे. या अंतरावर ही तुळई बसविणे आव्हानात्मक होते. आज स्थापन केलेली तुळई ही नरिमन पाईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर (कोस्टल रोड) स्थापन करण्यात आली. ही तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची असून १४३ मीटर लांब आणि ३१.७ मीटर रुंद आणि ३१ मीटर उंच आहे. (कोस्टल रोड)
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी, व्यवस्थापकीय संचालक (मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ) आश्विनी भिडे, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम,(कोस्टल रोड) मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) सर्व संबंधित अधिकारी, अभियंता प्रकल्प स्थळी उपस्थित होते. 


निरनिराळ्या टप्प्यांवर घेतली खबरदारी

भारतात प्रथमच समुद्रामध्ये १३६ मीटर लांबीचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसविण्यात येत आहे. जगात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याच्या घटना अत्यंत मोजक्याच आहेत. वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे. ही बांधकामप्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे. (कोस्टल रोड)

पहिली तुळई जोडणीच्या अनुभवाने वाढला आत्मविश्वास
याआधी, प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहिली तुळई स्थापन करण्यात आली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसरी तुळई स्थापन करण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या पथकाचा आत्मविश्वास दुणावला होता. आज पहाटे ३ वाजेपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही तुळई आधी स्थापन केलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे ६ वाजून ७- मिनिटांनी अडीच हजार मेट्रीक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली. (कोस्टल रोड)
सावधानता अन् उत्सुकता
वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाकडून मुंबई किनारी रस्त्या प्रकल्पाकडे जाणाऱ्या बाजूवर याआधी पहिली तुळई स्थापन करण्यात आली आहे. पहिली तुळई बसवितांना आजूबाजूला मोकळी जागा असल्याने अभियंत्यांना अंदाज घेण्यासाठी पुरेसा वाव होता. परंतु आज, दुसरी तुळई स्थापन करताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या तुळईचा अंदात घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पारण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या तुळईपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरी तुळई स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते. परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. (कोस्टल रोड)
अडीच हजार मेट्रिक टन वजनाची तुळई
मुंबई किनारी रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या तुळईपेक्षा तुलनेने दुसरी तुळई ही वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई ३१.७ मीटर रुंद, ३१ मीटर उंच आणि १४३ मीटर लांब आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतर फरक लक्षात घेता दुसरी तुळई स्थापन करणे आव्हानात्मक होते. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवार, दिनांक १२ मे २०२४ रोजी सकाळी दुसरी तुळई घेवून तराफा (बार्ज) निघाला होता. (कोस्टल रोड)