शेअर बाजार विश्लेषण: घसरणीनंतर बाजारात नैसर्गिक रिबाऊंड अमित शहांच्या वक्तव्याचा बाजारात परिणाम सेन्सेक्स व निफ्टीत वाढ

सेन्सेक्स १११.६६ अंकाने वाढत ७२७७६.१३ पातळीवर व निफ्टी ४८.२५ अंकांने वाढत २२१०४.५ पातळीवर

    13-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण : आज शेअर बाजारात मोठा रिबाऊंड झाला आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात बाजाराने वापसी केली आहे. आज बाजारातील नकारात्मक सुरूवात झाल्यानंतर बाजारात एक निराशेची लाट झाली होती. मात्र बाजारात शॉर्ट पोझिशनची समाप्ती होत बाजाराने उसळी मारण्याचे पसंत केले आहे. बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात १११.६६ अंशाने वाढ होत ७२७७६.१३ पोहोचले आहे तर निफ्टी ४८.२५ अंशाने वाढत २२१०४.५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५४.१५ अंशाने वाढ होत निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी म्हणजेच ५४५०७.५० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात ३३३.०० अंशाने ,०.७० टक्क्यांनी म्हणजेच ४८७५४.१० पातळीवर पोहोचला आहे.बीएसई मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३६ व ०.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एनएसईत मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.४१ व ०.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये निफ्टी ऑटो (१.६८%), मिडिया (०.२२%) पीएसयु बँक (१.२३%) ,कनज्यूमर (०.४१%),तेल गॅस (०.७५%) समभागात घसरण झाली असून निफ्टी रिअल्टी (१.२३%) हेल्थकेअर (१.५८%) मिडस्मॉल हेल्थकेअर (१.५८%) फार्मा (१.७७%) आयटी (०.४२ %) फायनांशियल सर्विसेस (०.७४%) समभागात वाढ झाली आहे.
 
आज बीएसईत (BSE) मध्ये ४०८६ समभागाचे ट्रेडिंग झाले असून त्यातील १७७७ समभाग वधारले असून २१८० समभागात घसरण झाली आहे.५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ १८३ समभागात झाली असुन ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण ५९ समभागात झाली आहे. त्यातील एकूण ११ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७४० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११३४ समभागात वाढ झाली आहे तर १५०० समभागात आज घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ ६३ समभागात झाली असुन ३८ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. आज ११४ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १४१ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
आज युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत मोठी घसरण कायम राहिली आहे. बाजारातील सोन्याच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील घट झाल्याने बाजारात किंमत घसरली असल्याने भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात बदल झाला आहे.युएस गोल्ड फ्युचर ०.८७ टक्क्यांनी घसरला होता. तर भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात १.१० टक्क्यांनी घसरण होत सोने ७१९३०.०० पातळीवर पोहोचले आहे. भारतातील सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १०० ते ११० रुपयांनी घसरले आहेत
 
भारतातील २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १०० रुपयांनी घसरण होत सोन्याचे दर ७३२५० रुपयांवर पोहोचले आहेत.
जागतिक पातळीवरील आज सकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. बाजारातील घटती मागणी व उतरलेला डॉलर यामुळे बाजारात क्रूड ऑइल स्वस्त झाले होते. मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.
 
मर्यादीत क्रूडची उपलब्धता व डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने पुन्हा एकदा क्रूड महाग झाले आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४३ टक्क्यांनी वाढ होत क्रूड तेलाच्या किंमतीत प्रति बॅरेल दर ६५७९.०० पातळीवर पोहोचले आहेत.
 
आज सकाळी VIX Volatility Index निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. १७ ते १८ टक्क्यांनी या निर्देशांकात वाढ झाल्याने सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी घट झाली होती. बाजारातील मोठ्या प्रमाणात बाजार भाव पडल्याने गुंतवणूकदारांना नुकसान झाले होते मात्र ही फेज संपत पुन्हा एकदा बाजार वरच्या पातळीवर झुकले व बाजारातील रॅली सुरू झाली होती.अखेरच्या सत्रात बाजारात परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या तुलनेत भारतीय बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केल्याची शक्यता आहे.
 
गेल्या आठवड्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून इतर आकर्षक आकडेवारी आल्याने चीन, हाँगकाँग बाजारात गुंतवणूक करण्याचे ठरवले होते. आकडेवारीनुसार १० मे पर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी १८३७५ कोटींचे समभाग विकले होते. परिणामी बाजारात पोकळी निर्माण झाली होती.दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता जूनपर्यंत नसल्याने पुन्हा गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात लक्ष केंद्रीत केले होते.
 
चीनमध्ये किरकोळ विक्रीत झालेली वाढ, इंडस्ट्रीतील आऊटपुट सुधारणेनंतर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांना अपेक्षा वाढली होती. सुधारित आकडे आल्यानंतर हा ओघ चीनकडे गेला असला तरी भारतातील तिमाहीचे अपेक्षित निकाल, भारतातील निवडणूका यामुळे बाजार पडले असले तरी पुन्हा बाजारात ' नफा बुकींग' ची फेज संपत बाजारात पुन्हा नाट्यमयरित्या उसळी मारली आहे.
 
भारतामध्ये नवीन येणाऱ्या सरकारमुळे व तसेच भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याने पुन्हा एकदा बाजारात विश्वासाची लाट निर्माण झाली होती.'आर्टिफिशियल प्राईज करेक्शन झाल्याने बाजारात पुन्हा एकदा मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी हालचाल परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे अमित शहा यांनी शेअर बाजारावरील केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहा यांनी बाजारातील चढउतार ही केवळ 'अफवे' वर आधारित असल्याचे वक्तव्य केल्याने बाजारात 'आर्टिफिशियल ' फेज पुन्हा नैसर्गिकरित्या फेज मध्ये रुपांतरित होते का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. बाजारातील भाजपाचे ४०० प्लसमिशन किती सत्यात उतरते व काही दिवसांवर निवडणूकीचा निकाल ठेपलेला असताना बाजारातील गुंतवणूकदार कसे प्रतिसाद देतात यावरून आगामी आर्थिक वर्षातील बाजाराचे भविष्य निर्भर होणार आहे.
 
अखेरच्या सत्रात बीएसईत एशियन पेंटस, सनफार्मा टीसीएस, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील,पॉवर ग्रीड, जेएसडब्लू स्टील, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह,विप्रो, एचयुएल या समभागात वाढ झाली आहे तर टाटा मोटर्स, एनटीपीसी, एसबीआय, भारती एअरटेल, टायटन कंपनी, रिलायन्स, आयटीसी, एचसीएलटेक, एम अँड एम, इंडसइंड बँक, इन्फोसिस, मारूती सुझुकी या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज सिप्ला, एशियन पेंटस, अदानी पोर्टस,डिवीज,अदानी एंटरप्राईज, एचडीएफसी बँक, टीसीएस, ब्रिटानिया, हिंदाल्को, सनफार्मा, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक,पॉवर ग्रीड , जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ग्रासीम, हिरो मोटोकॉर्प,बजाज ऑटो, विप्रो या समभागात वाढ झाली आहे तर टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, टायटन कंपनी,एसबीआय इंडसइंड बँक, एम अँड एम, आयटीसी, रिलायन्स, एचसीएलटेक, डॉ रेड्डीज, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, मारूती सुझुकी या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'सलग पाच दिवसाच्या विक्रीमुळे निर्देशांक ऑल टाईम हाय वरून स्थिर होण्यास सुरवात झाली आहे. अनेक शेअर आकर्षक लेवल दाखवत आहेत. आजच शाॅर्ट कवरींग होत बाजार पाॅझिटिव झाला आहे. उद्यापासुन चाल बदलू शकते व सर्व गोष्टी पूर्ववत होऊ शकतात. अशा प्रकारे बाजारात विक्री होणे हे खुप महत्वपूर्ण आहे. बाजार प्रत्येक लेवल मजबुत होण्याकरिता वेळोवेळी तेजी नंतर विक्री या कंसोलीडेशनच्या सर्व पायऱ्या बाजाराने पार केलेल्या दिसत आहेत. रिलायन्स, एसबीआयमुळे आज बाजार नरमच होता. एचडीएफसी पाॅझीटीव दिसल्यावर बाजारात जान आली.
 
आता विदेशी संस्थांची विक्री कमी होणे अपेक्षित आहे.अमेरिकेतील बाॅड मार्केटमधे खुप कमी झालेले दरांमुळे बाजारात विक्री करून ADR व GDR स्वस्तात मिळत असल्याने बाॅड मार्केट आकर्षक झाला आहे. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून जवळजवळ ६०००० कोटी ची विक्री विदेशी संस्थांमार्फत झाली आहे.
 
दुसरे कारण निवडणुकीमूळे सावध पवित्रा.आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर बाजाराला थोडी स्थिरता येईल व अमेरिकन महागाई, CPI वगैरे मुद्दे व त्या अनुषंगाने व्याज दर कपात जुन किंवा जुलै मधील सभेमधुन काय होईल याकडे लक्ष लागेल. तोपर्यंत भारतातील निवडणूक प्रक्रियेतुन काहीतरी नक्कीच चांगले निष्पन्न होण्याचा विश्वास बाजारात येईलच. व नवीन नवीन उच्चांकासाठी बाजार सज्ज होईल असे चित्र हळुहळु दिसेल.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी ०.२२% ने २२१०४ वर आणि सेन्सेक्स ०.१५% ने ७२७७६ वर बंद झाला. निफ्टी फार्मा आणि निफ्टी मेटल अनुक्रमे १.७७%आणि १.३१ % ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते.
 
कंपनीचे उत्स्फूर्त व्यवस्थापन भाष्य,Q4FY24 मधील ठोस कमाईच्या कामगिरीमुळे मजबूत उलाढालीच्या आशा वाढल्याने डॉ लाल PathLabs ६.२४ % वर बंद झाले. डायग्नोस्टिक चेनने Q4FY24 साठी तिच्या निव्वळ नफ्यात ४९% वार्षिक वाढ ८४.५ कोटी रुपये केली आहे. वार्षिक आधारावर महसूल ११% वाढून ५४५.५ कोटी झाला. चाचणी मिश्रणामुळे उत्पन्नात वाढ झाली, जसे की प्रति रुग्ण चाचण्यांमध्ये वाढ आणि नमुन्यातील वाढ.
 
फार्मा क्षेत्रातील प्रभावी परिणामांनी आज फार्मा समभागांमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित केले.निफ्टीमध्ये सिप्ला, एशिया पेंट्स, अदानी पोर्ट, डिव्हिस लॅब्स आणि अदानी एंटरप्राइझ हे टॉप गेनर होते तर टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्री राम फायनान्स, एनटीपीसी आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे.'
 
बाजारातील स्थितीविषयी प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले, ' आज निफ्टी ०.२२% ने २२१०५ वर आणि सेन्सेक्स ०.१५% ने ७२७७६ वर बंद झाला. निफ्टी फार्मा आणि निफ्टी मेटल अनुक्रमे १.७७% आणि १.३१% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते. कंपनीचे उत्स्फूर्त व्यवस्थापन भाष्य आणि Q4FY24 मधील ठोस कमाईच्या कामगिरीमुळे मजबूत उलाढालीच्या आशा वाढल्याने डॉ लाल Path Labs ६.२४ % वर बंद झाले.
 
डायग्नोस्टिक चेनने Q4FY24 साठी तिच्या निव्वळ नफ्यात ४९% वार्षिक वाढ ८४.५ कोटी रुपये केली आहे. वार्षिक आधारावर महसूल ११.५ वाढून ५४५.५ कोटी झाला.चाचणी मिश्रणामुळे उत्पन्नात वाढ झाली, जसे की प्रतिरुग्ण चाचण्यांमध्ये वाढ आणि नमुन्यातील वाढ. फार्मा क्षेत्रातील प्रभावी परिणामांनी आज फार्मा समभागांमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित केले.निफ्टीमध्ये सिप्ला, एशिया पेंट्स, अदानी पोर्ट, डिव्हिस लॅब्स आणि अदानी एंटरप्राइझ हे टॉप गेनर होते तर टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्री राम फायनान्स, एनटीपीसी आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,दिवसाच्या निचांकीपासून बाजार उलटला असला आणि किरकोळ नफ्यासह संपला असला तरी, प्रगतीशील सार्वत्रिक निवडणूक आणि उच्च मूल्यांकनामुळे गुंतवणूकदार चिंतित आहेत.प्रमुख सकारात्मक ट्रिगर्सची अनुपस्थिती आणि देशांतर्गत बाजारातून FII ची उड्डाण अल्पकालीन टिकेल. भारत आणि यूएस महागाईचा डेटा आणि FED चेअरचे भाषण नजीकची दिशा मिळण्याआधी गुंतवणूकदार सावध राहतील.'
 
बाजारातील निफ्टीतील हालचाली विषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,' निफ्टीने दैनंदिन चार्टवर एक हॅमर पॅटर्न तयार केला आहे, जो सुधारणेनंतर संभाव्य तेजीच्या उलट दर्शवितो. या व्यतिरिक्त,दैनिक टाइमफ्रेमवर स्टॉकला मागील स्विंगच्या आसपास समर्थन मिळाले आहे. तथापि, २२१५० मध्ये निर्देशांकाच्या रिकव्हरीला विरोध होऊ शकतो.-२२००० झोन, आणि २२२०० वरील केवळ एक निर्णायक हालचाल बाजारात मजबूत रॅली आणू शकते, खालच्या बाजूस, समर्थन २१९५० वर स्थित आहे.'
 
बाजारातील बँक निफ्टी निर्देशांकावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, ' बँक निफ्टी निर्देशांकाने खालच्या स्तरावरून मजबूत रिकव्हरी पाहिली आणि १००-दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (EMA) वर त्याचे समर्थन टिकवून ठेवण्यास व्यवस्थापित केले. त्याच्या 20-दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज (DMA) कडे परत जाण्याची शक्यता आहे ४८२०० जोपर्यंत निर्देशांक ४७२०० ची सपोर्ट पातळी राखून ठेवतो, जेथे तेजीची क्रिया दिसून येते, तोपर्यंत निर्देशांक खरेदी मोडमध्ये राहतो.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'आठवडा बाजारातील अस्थिरतेने सुरू झाला, परंतु अखेरीस, तो किरकोळ नफा मिळवण्यात यशस्वी झाला.सुरुवातीला मंदीच्या भावनांनी पुनर्प्राप्तीचा मार्ग दिला,विशेषत: महत्त्वाच्या हेवीवेट्समध्ये, ज्याने केवळ तोटाच मिटवला नाही तर निर्देशांकाला २२१२५.५० वर दिवसाच्या शिखराजवळ बंद करण्यास प्रवृत्त केले.क्षेत्रनिहाय, फार्मा, धातू आणि रिॲल्टी क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली, तर वाहन आणि ऊर्जा क्षेत्रात घसरण दिसून आली. हा ट्रेंड व्यापक बाजारपेठेतही विस्तारला, मिडकॅप्स किंचित जास्त तर स्मॉलकॅप्स नकारात्मक क्षेत्रात संपले.
 
अस्थिरता निर्देशांकात सातत्याने वाढ होत असूनही, निफ्टीला २१,८०० च्या गंभीर पातळीवर आधार मिळाला. २२३००- २२४०० श्रेणीचा भंग करणे आव्हानात्मक असले तरी बँकिंग क्षेत्रातील अपेक्षित स्थिरता आणि आयटी आणि ऊर्जा सारख्या क्षेत्रातील निवडक हेवीवेट्स आणखी वरच्या दिशेने चालना देऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेता, सहभागींना सावधपणे त्यांच्या पोझिशन्स समायोजित करण्याचा आणि अती आक्रमक ट्रेडिंग धोरणांपासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला जातो.'