'परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिखट'; पुण्यात गाजलं प्रवीण तरडेंचं भाषण

    11-May-2024
Total Views |
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पुण्यात झालेल्या जाहीर सभेत दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं भाषण सध्या चर्चेत आहे.
 

pravin  
 
मुंबई : देशभरासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु आहे. उमेदवारांसाठी प्रचारसभा देखील मोठ्या जल्लोषात केल्या जात असून १० मे रोजी पुण्यात भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Loksabha Elections 2024) यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेला मनसे प्रमुख राज ठाकरेंसह, इतर राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती. या सभेत लेखक-अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या भाषणाची. यावेळी 'परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिखट', अशा तिखट शब्दांत तरडेंनी (Loksabha Elections 2024) केलेले भाषण चांगलेच चर्चेत आहे.
 
प्रवीण तरडे यांनी भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाचीही स्तुती करत म्हटले की, "मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी आज आमच्या दोस्तीचा पॅटर्न खूप लांबवर पोहोचवायला आलो आहे. कुणीतरी पुण्याचा रंग बदलायचा प्रयत्न करत आहे. उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने पुण्यात रक्त सांडलंय. त्यामुळे पुण्याचा रंग बदलणं सहजासहजी शक्य नाही."
 
पुढे ते म्हणाले, "राज ठाकरे मंचावर उपस्थित आहेत. साहेब आमचा आदर्श आहेत. धर्मवीरमधील राज ठाकरेंचा सीन कट झाला. तेव्हा मनसेचे कार्यकर्ते माझ्यावर नाराज झाले होते. पण साहेबांना त्याचं कारण माहित होतं. मुरलीधर मोहोळचा मित्र म्हणून एवढंच सांगेन की, भाजपाने पुण्याला पुढील अनेक वर्षांसाठी खंबीर नेतृत्व दिलंय. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा. मुळशीतल्या मावळ्यांनी मोदींना दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. हाच मुळशीचा प्रामाणिकपणा आपल्याला लांबवर पोहोचवायचा आहे." असं खणखणीत भाषण प्रवीण तरडेंनी केले.