बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना प्रोत्साहन हाच काँग्रेसचा अजेंडा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगाणात काँग्रेसवर हल्लाबोल

    10-May-2024
Total Views |
Narendra Modi on Congress

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेलंगणातील महबूबनगर लोकसभा मतदारसंघातील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने राज्याचा विश्वासघात केला आहे. तसेच काँग्रेसने तेलंगणाला एटीएम बनवल्याचे ही त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी बीआरएस सरकारवरही हल्लाबोल केला.
 
राज्यातील रेवंत रेड्डी सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, , “आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी लाखो कोटी रुपये पाठवले, पण हा पैसा गेला कुठे, आधी बीआरएसने तेलंगणाला भ्रष्टाचाराचे एटीएम लावून खिसे भरले आणि आता काँग्रेसने लुटले. ", अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, काँग्रेस इथे सत्तेवर येण्यासाठी खूप आश्वासने दिली पण सत्तेत आल्यानंतर ती बीआरएसची फोटोकॉपी झाली, अशी टीका ही मोदींनी केली.

अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तेलंगणातून अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "येथे उद्योग उभारण्याचे आश्वासन देऊन काँग्रेस सत्तेत आली, पण नंतर त्यांनी बनावट व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली." बीआरएसच्या घोटाळ्यांवर काँग्रेस कोणतीही कारवाई करत नसल्याचे ही पंतप्रधान मोदी म्हणाले. 
 
रॅलीत पंतप्रधान मोदींनी आरआर टॅक्सचाही उल्लेख केला. मोदी म्हणाले की, ते आरआर टॅक्सवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेत नसून ते स्वतः मीडियाला स्पष्टीकरण देत आहेत. तेलंगणाचे चित्र बदलण्यासाठी भाजपला अधिक प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

महबूबनगरमधील रोजगाराचा प्रश्न उपस्थित करताना पंतप्रधान म्हणाले, “या भागाला तुंगभद्रा आणि कृष्णा नद्यांचे वरदान लाभले आहे, परंतु तरीही येथील लोकांना मजुरीसाठी स्थलांतर करावे लागते. येथील सिंचन प्रकल्पांची प्रगती होत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन काँग्रेस पूर्ण करत नाही. काँग्रेसने राज्याचा विश्वासघात केला आहे.
 
येथे पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावरही हल्लाबोल केला. तो म्हणाला, “राजपुत्राचा सल्लागार अमेरिकेत राहतो, त्याने दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन असल्याचे सांगितले आहे. ते तेलंगणातील लोकांना आफ्रिकन मानतात कारण त्यांना तुमच्या त्वचेचा रंग आवडत नाही.”

 काँग्रेस हिंदू आणि हिंदू सणांचा द्वेष करतो, असा आरोप मोदींनी केला. त्यामुळेच हे लोक व्होट जिहादबद्दल बोलतात, असे ही मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर धर्म आणि जातीच्या आधारावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणामुळे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, पण तरीही काँग्रेस मागे हटत नाही. हाच काँग्रेसचा खरा अजेंडा असल्याचे ते म्हणाले.