एसआयपी म्युचल फंड गुंतवणूकीत 'गगनभेदी' वाढ ! एप्रिल महिन्यात २०३७१ कोटी

एप्रिल २०२४ मध्ये एसआयपीमधील संख्या ६३६४०९७ कोटींवर

    10-May-2024
Total Views |

SIP
 
 
 
मुंबई: म्युचल फंड एसआयपी (SIP) गुंतवणूकीत मोठी वाढ झाल्याचे असोसिएशन ऑफ म्युचल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने आपल्या आकडेवारीत स्पष्ट केले आहे. भारतातील एसआयपी गुंतवणूकीत १९२७१ कोटींवरून वाढ होत २०३७१ कोटींवर गुंतवणूक पोहोचली आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी वाढ एसआयपी गुंतवणूकीत झालेली आहे.
 
म्युचल फंडाच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management) मध्ये एप्रिलपर्यंत ५७.२५ लाख कोटींची वाढ झाल्याचे यात म्हटले गेले आहे या आकडेवारीत म्हटल्याप्रमाणे, निव्वळ म्युचल फंडाचा ओढा २.३९ लाख कोटी होती.
 
याशिवाय ओपन एंडेड (Open Ended) फंडात १.९ लाख कोटींची वाढ झाली आहे. यामध्ये व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) मध्ये १८.९२० कोटीवरून पाच टक्क्यांनी वाढ होत २४.७ लाख कोटींवर वाढ झाली आहे. ओपन एंडेड हायब्रीड फंड (Open Ended Hybrid Fund) १९.८६० कोटींवर वाढ झाली आहे तर हायब्रीड फंडमधील निव्वळ वाढ ७.५८ लाख कोटींवर पोहोचले आहे.
 
लिक्वीड फंड नेट इन्फलो एप्रिल महिन्यात १.०३ लाख कोटींवर पोहोचले आहे. एप्रिल २०२४ मध्ये एसआयपीमधील संख्या ६३६४०९७ कोटींवर पोहोचले आहे. मार्च २०२४ मधील १०७१६६५.६३ कोटींच्या तुलनेत एप्रिलमध्ये वाढ होत ११२६१२८.६७ कोटींवर पोहोचले आहे. रिटेल म्युचल फंड पोर्टफोलिओत मार्च महिन्यातील १४२४४२८२३ कोटींच्या तुलनेत एप्रिल महिन्यात १४५३५७८९२ कोटींवर पोहोचले आहे.
 
म्युचल फंड पोर्टफोलिओ एप्रिल २०२४ पर्यंत १८१५६८२८६ कोटींवर वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात एकूण नऊ योजना लाँच झाल्या होत्या. मार्च महिन्यातील ८३९७१२९९ खाती उघडली गेली जी एप्रिल २०२४ मध्ये ८७०११४०१ संख्येपर्यंत खाती वाढली आहेत. यामधील एकूण ९३ टक्के खाती ' केवायसी व्हेरिफिकेशन ' केलेली आहे तर उर्वरित खाती 'ऑन होल्ड' असल्याचे संस्थेने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.
 
याविषयी बोलताना एएमएफआयचे मुख्य अधिकारी वेंकट चलसानी म्हणाले, ' म्युचल फंड उद्योग नवीन स्तरांवर पोहोचला, निव्वळ एयुएम ५७.२६ लाख कोटी आणि एसआयपी खाती ८.७० कोटींवर पोहोचली. २०३७१ ४७ कोटींचे ऐतिहासिक एसआयपी योगदान एयुएमला ६३.७५ लाख नवीन एसआयपी नोंदणींसह ११.२६ लाख कोटी गुंतवणूकदारांचा विश्वास दाखवतात.'
 
एप्रिल २०२४ पासून लागू होणाऱ्या केवायसी नियमांच्या संदर्भात, म्युच्युअल फंड उद्योग सुरळीत प्रक्रियेसाठी चिंता दूर करत आहे. AMCs, वितरक आणि इतर भागधारकांसह, आम्ही सर्वांसाठी एक अखंड केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे संपूर्ण मंडळामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीची अखंडता आणि सुलभता सुनिश्चित होईल.'