एएसआयचा निर्णय हिंदूंच्या बाजूनेच...

भोजशाळा प्रकरणी आलोक कुमार यांनी दर्शविला विश्वास

    03-Apr-2024
Total Views |

VHP-Bhojshala

नवी दिल्ली :
वाराणसीतील ज्ञानवापी मंदिरातच्या व्यास तळघरातील पूजा सुरुच राहणार असल्याचे सोमवार, दि. १ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रणाने मध्य प्रदेशातील भोजशाळेचे (VHP Bhojshala) वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मुस्लिम पक्षाची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी एएसआयचा निर्णय हिंदूंच्या बाजूनेच असेल असा विश्वास दर्शविला आहे.

हे वाचलंत का? : 'इछामती' प्रकरणी विहिंपचे राष्ट्रपतींना पत्र; 'CBI-NIA' मार्फत तपासाची केली मागणी!

आलोक कुमार यांनी म्हटले आहे की, "राजा भोजचे शहर असलेल्या धार येथे असलेल्या भोजशाळा इमारतींची शास्त्रोक्त तपासणी करून या इमारतींचे खरे स्वरूप काय आहे, याचा शोध घेण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत, ही आनंदाची बाब आहे. याचा अर्थ भोजशाळा मूळ स्वरुपात मंदिर आहे की मशीद हे एएसआय शोधून काढेल. मी देखील या वास्तूंना भेटी दिल्या होत्या. हे ठिकाण हिंदू स्वरूपाचे आहे हे उघड्या डोळ्यांना दिसत आहे, त्यामुळे 'एएसआय'चा निर्णय हिंदूंच्या बाजूनेच असेल याची खात्री आहे."


पुढे ते असेही म्हणाले की, "या आदेशाविरोधात घाबरलेल्या मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर १ एप्रिल रोजी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सर्वेक्षणावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. या याचिकेची नोटीस देण्यात आली असून, सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला देण्यात आले आहेत."