उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर! वाचा कोण कुठे लढणार...

    03-Apr-2024
Total Views |

UBT 
 
मुंबई : राज्यात लवकरच लोकसभा निवडणूका होणार आहेत. अशातच आता उबाठा गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चार लोकसभेच्या जागांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगाव या जागांचा समावेश आहे.
 
उबाठा गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हातकणंगलेतून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  "उबाठाचे ८ आमदार संपर्कात! लवकरच शिंदेंशी भेट घडवून देणार"; बड्या नेत्याचा दावा
 
दुसरीकडे, भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार उन्मेश पाटील आणि करण पवार यांनी नुकताच उबाठा गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर लगेच करण पवार यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. करण पवार हे उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.