ओला कंपनीचा आयपीओ येणार

पुढील तीन महिन्यांत सेबीकडे आयपीओसाठी अर्ज

    20-Apr-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: ओला कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होऊ शकतो. तसे वृत्त वृत्तसंस्थांनी दिली आहे. ओला कंपनीने आयपीओ (IPO) मार्फत ५०० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचे ठरवले आहे. यासाठी ओला कंपनीने सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी अर्ज करत पेपर फाईल केले आहेत. सेबीची परवानगी मिळाल्यावर ओला आपल्या कंपनीचा आयपीओ आणणार आहे.
 
आपल्या आयपीओसाठी कंपनी गोल्डमन सच,बँक ऑफ अमेरिका,सिटी,कोटक बँक,एक्सिस बँक या संस्थाशी संपर्कात आहे. आर्थिक वर्ष २०२१ नंतर कंपनीने आयपीओसाठी प्रयत्न सुरू केले होते. जुन २०१९ पर्यंत ओला कंपनीचे मूल्यांकन ५.७ अब्ज डॉलर होते. मागील वर्षाच्या मे महिन्यात कंपनीच्या मूल्यांकनात ३५ टक्क्यांनी विविध कारणांमुळे घसरण झाली होती.
 
याशिवाय कंपनीने ओला कॅब,ओला इलेक्ट्रिक,ओला फायनांशियल सर्विसेस या कंपनीतून २०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. पुढील तीन महिन्यांत ओला आयपीओसाठी अर्ज करणार आहे.
 
ओला कंपनी २०१० साली SoftBank, Tiger Global यांच्या पाठबळावर स्थापन झाली होती. कंपनी विस्तारीकरणासाठी व भांडवली गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी या आयपीओसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ओला कंपनीला २१३५ कोटींचा महसूल मिळाला होता. कंपनीच्या महसूलात आर्थिक वर्ष २२ पेक्षा ही वाढ ३५ टक्यांने झाली होती.कंपनीने पहिल्यांदा EBITDA (कर व इतर खर्चापूर्वीचा नफ) २५० कोटींपर्यंत प्राप्त केला होता. त्याआधी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा EBITDA घसरत ६६ कोटींचे नुकसान झाले होते. मध्यंतरीच ओलाने भारतात लक्ष केंद्रित करण्यासाठी परदेशातील आपली टॅक्सी सेवा बंद केली आहे.