शेअर बाजार अपडेट: नव्या आर्थिक वर्षी शेअर बाजार सुसाट निफ्टी व सेन्सेक्स उसळला

सकाळी गिफ्ट निफ्टी ५५ अंशाने उसळला

    01-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण
 
मुंबई: आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जबरदस्त उसळी सकाळच्या सत्रात दिसली आहे. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकात आज सेन्सेक्स निर्देशांक १२८.१० अंशाने उघडला असून २२४५५ पातळीवर पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्स निर्देशांकात आज ३१७.२७ अंशाने उसळत ७३९६८.६२ पातळीवर पोहोचला आहे. आज बहुतेक निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. विशेषतः लार्जकँप व्यतिरिक्त मिड कॅप व स्मॉलकॅपमधील निर्देशांकात चांगली वाढ झाल्याने एकूण शेअर बाजारात चांगली वाढ झाली आहे.
 
बँक निर्देशांकातही ३९३.०२ अंशाने वाढ होत ५३९०८.२१ पातळीवर निर्देशांक पोहोचला. निफ्टी बँक निर्देशांकातही आज ०.८२ टक्क्याने म्हणजेच ३८८. ६५ अंशाने वाढत ४७५१३.२५ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीतही ५५ अंशाने वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात चांगले आर्थिक संकेत मिळाले होते. बीएससीवर सकाळच्या सत्रात ४४८ समभाग (शेअर) अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत तर एनएससीवर २८९ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत.
 
निफ्टीतील सेक्टोरल इंडायसेसमध्ये (क्षेत्रीय निर्देशांकात) मिडिया व मेटल निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे.
 
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याज दरात जूनमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली असल्याने त्यांचे संकेत आशियाई बाजारात दिसले आहेत. सकाळी टाटा स्टील, जेएसडब्लू स्टिल, कोटक बँक, एचडीएफसी बँक या समभागात १ ते २ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
सकाळच्या सत्रात मार्केटने कामग केल्याविषयी प्रतिक्रिया देताना, जीओजित फायनांशियल सर्विसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ व्ही के विजयकुमार म्हणाले, बाजाराचा अंडरटोन तेजीचा आहे आणि बाजारात गती आहे. बाजार एकत्र येण्याची चिन्हे दाखवत आहे, परंतु गेल्या 2 व्यापार दिवसांत निफ्टीमध्ये ३२२ अंकांनी झालेली वाढ हे सूचित करते की वरची गती कायम राहू शकते.
 
म्युच्युअल फंडांनी स्मॉलकॅप्स योजनांमधून रिडम्प्शनवर निर्बंध आणल्याच्या बातम्या आहेत. हे या विभागातील ‘फॉथी’ मूल्यांकन आणि नियामकाने व्यक्त केलेल्या चिंतेला प्रतिसाद म्हणून आहे. या कृतीचा परिणाम म्हणजे लार्जकॅप्समध्ये जास्त प्रमाणात निधीचा प्रवाह होईल, ज्यामुळे लार्जकॅप्स वाढू शकतात. त्यामुळे,ऑटोमोबाईल्स, भांडवली वस्तू, वित्तीय आणि निवडक फार्मामधील लार्जकॅप्सकडे लक्ष द्या जे चांगले Q4 क्रमांक पोस्ट करतील. ३ ते ५ एप्रिल रोजी होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीत दर अपरिवर्तित राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता नाही."