उद्धव ठाकरेंनी १ कोटी घेतले, असा आरोप करणारे मंत्री केसरकर हे काही पहिले नाहीत!

    08-Feb-2024
Total Views |
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray


शंभर खोके एकदम ओके ही घोषणा गेल्या दोन वर्षांपासून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांच्या तोंडी आपण ऐकली असेल. मुख्यतः ही वाक्य ठाकरे गटाच्या नेत्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर केल्या जाणाऱ्या आरोपात पाहायला मिळायची. पण आज हे चित्र बदलण्यात शिवसेनेला शिंदे गटाला यश मिळालं आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केलायं. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केरसकर यांनी दि.८ फेब्रुवारी २०२४ ला केला. आता तुम्ही म्हणाल की हा फक्त आरोप आहे. यात काही तथ्य नाही. किंवा ही राजकीय खेळी असू शकते. मात्र, या व्हीडिओत आपण अशा काही घटना जाणून घेणार आहोत. ज्यामुळे सातत्यने सर्वच आरोप करणाऱ्यांनी बोट दाखवलं होतं ते उद्धव ठाकरेंकडे.

सुरुवातीलाच दिपक केसकरांनी काय आरोप केले? ते जाणून घेऊ. दि. ८ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दिपक केसरकर म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना एक कोटींचा चेक दिला होता. त्यांचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे. पण हे पैसे मंत्रिपदासाठी घेतले की निवडणुकीसाठी हे माहिती नाही. पण आदित्य ठाकरेंना माझ्या जवळच्या एका पत्रकारे प्रश्न विचारला की, कोकणातून कोण मंत्री असणार? त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही. पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्यावरून कमिटमेंट म्हणजे आगाऊ पैसे दिले नाहीत, असा धरायचा का असा प्रश्न केसरकारांनी उपस्थित केला आहे. तसेच पक्षासाठी पैसे लागतात ते देणं अलाऊड आहे, असं ही केसरकर म्हणाले. पण आधी सांगितल्याप्रमाणे ठाकरे गटावर झालेले हे पहिले आरोप नाहीत.याआधी दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आरोप केले होते. राज ठाकरे म्हणाले की, धारावी पुनर्विकास कामाचे कंत्राट काढून १० महिने झाल्यानंतर आज मोर्चा निघतोय. याचा अर्थ सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला होता. ज्यात ही एकप्रकारे ठाकरेंच्या आर्थिक व्यवहारावर राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं.

तसेच खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नारायण राणे म्हणाले की, एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा. दरम्यान सहारा कंपनीने एक हॉटेल विकत घेतलं होतं. त्या हॉटेलमधील जुन्या कामगारांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मग, हॉटेलमधील १४० मराठी कामगारांना कामावरून काढायचं कसं हा प्रश्न पडला. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हॉटेलमध्ये दगडफेक करण्यात सांगितलं. नंतर उद्धव ठाकरेंसोबत तडजोड झाली. आणि एका कामगारामागे ४ लाख रुपयेप्रमाणे ७ कोटी रुपये घेण्यात आले. ज्यामुळे जुने १४० कामगार बेरोजगार झाले, असे आरोप ठाकरेंवर नारायण राणेंनी केले होते. तसेच आम्ही सुद्धा कुठल्या दिवशी काय दिलं, कोणत्या गेटने आत गेलो, याची डायरी लिहिली आहे. उद्धव ठाकरे सांगेल त्यादिवशी मी जाहीर करेल की मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं ते, असे आव्हानचं राणेंनी ठाकरेंना दिले होते.

त्याचबरोबर शिवसेनेनंतर बंडानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर होणाऱ्या खोक्यांच्या आरोपावर मौन सोडत एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्हाला ५० कोटी द्या असे पत्र पाठवण्यात आले होते, त्यामुळे महागद्दार कोण आहे? हे सांगायला नको. म्हणून ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, शिवसेनेशी, शिवसैनिकांशी काही देणंघेणं नाही. फक्त ५० खोक्यांवर त्यांचा डोळा आहे. याचा इतर लोकांनी विचार करावा, असे शिंदे म्हणाले.तसेच अजुन किती शिवसैनिकांचा बळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटूंब घेणार आहे. स्वतः भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे. मग कारवाई होत असताना कधी रवींद्र वायकर, कधी सूरज चव्हाण नावं समोर येतात. पण कधीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगावे की आम्ही पैसे घेतले आमच्या नावाने पैसे फिरले होते, असा आरोप नितेश राणेंनी केला होता.

इतकंच नाही तर, शिवसेनेतील बंडानंतर करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये बीड जिल्हयात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत. आर्थिक देवाणघेवाण करून पदे दिले जात असल्याचा आरोप ठाकरे गटावर केला आणि आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले होते. तसेच बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख असणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे जिल्ह्यात दादगिरी करून आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत, असा आरोप केला होता. ज्यात जाधव यांनी सुषमा अंधारेंना मारहाण केल्याची माहिती खुद्द जाधव यांनीच दिली होती. यासर्व आरोप लक्षात घेता, ठाकरे गटावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप याआधी ही झाले आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.