मिटकरींनी आव्हाडांना झापलं, म्हणाले- 'या व्यक्तीला लाज नाही...'

    06-Feb-2024
Total Views | 109
Amol Mitkari on Jitendra Awhad

मुंबई
: दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचा असल्याचे आयोगाने सांगितले. त्यानंतर आव्हाडांनी बाप सोडल्याची टीका केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना झापलं आहे.

मिटकरी म्हणाले की, ज्या व्यक्तिला मुळातच लाज नाही, त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं. त्यामुळे लाज तर त्यांना वाटायला हवी कारण ते लाजेमुळे परेशान आहेत. मी त्यांच्याबद्दल नवीन काय बोलू. त्यामुळे अशा माणसाच्या बोलण्याला गल्लीबोळातील मुलं पण भाव देत नाहीत. त्यामुळे त्याव्यक्तिबद्दल बोलून मला आजच्या आनंदाच्या दिवसांत विर्जण पाडायचं नाही, असे मिटकरी म्हणाले. तसेच अजितदादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात. ते नेहमीच आनंदी असतात, असे ही मिटकरी म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121