कामगार कबड्डी स्पर्धेत न्यु इंडिया इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, अमरहिंद सरशी

    04-Feb-2024
Total Views |
State Level Workers Kabaddi Competition

मुंबई : राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यांत पुरुष शहर विभागातील लढतीत न्यु इंडिया इन्शुरन्स वि.रिझर्व्ह बँक यांच्यात अटीतटीची सामना झाला. पहिल्या डावात न्यू इंडियाने १८ - ०९ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रिझर्व्ह बँकेने आक्रमक खेळ दाखवत न्यू इंडियाला नमवले २१-२८ गुणांसह नमवले. परंतु पहिल्या डावात घेतलेल्या ९ गुणांच्या आघाडीमुळे २ गुणांच्या फरकासह न्यु इंडिया विजयी झाली. न्यु इंडियाच्या कौस्तुभ शिंदेने उत्कृष्ट चढाई तर ओमकार येनपुरेने उत्कृष्ट पकड केली. रिझर्व्ह बँकेच्या तुषार शिंदे व रुबेल तेलगरे यांनी दिलेली निकराची झुंज अपयश ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची ठरलेली ही लढत न्यु इंडियाने २ गुणांच्या फरकाने जिंकली.
 
माझगाव डॉक विरुद्ध भारत पेट्रोलियम, शिवडी यांच्यातही कडवी झुंज झाल्याचे दिसून आले. पहिल्या डावात रोहन पाटील, आदिनाथ गायकवाड यांच्या चढाई व सुनील मल्लाई यांच्या पकडीच्या जोरावर भारत पेट्रोलियमने ०८ - १२ अशी ४ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात माझगाव डॉकने शर्तीचे प्रयत्न करत १० - ०८ अशी २ गुणांनी आघाडी घेतली. हा सामना 18-20 अशा 2 गुणांच्या फरकाने भारत पेट्रोलियमने जिंकला. माझगाव डॉककडून अनिकेत ठाकूर, स्वप्नील शिंदे यांनी चांगला खेळ दाखवला.

महिला शहरी विभागात ठाण्यातील ओम वर्तकनगर विरुद्ध उपनगरच्या स्नेहविकास क्रीडा मंडळ यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. पहिल्या डाव 11-21 गुणांसह स्नेहविकासने आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ओम वर्तकनगरने पूजा जाधव, पूर्वा इंगावले यांच्या खोलवर चढायांच्या जोरोवर २५ -१३ अशी जोरदार मुसंडी मारल 2 गुणांच्या फरकाने सामना जिंकला. सोनाली पाटील, रिया तावडे हे पराभूत संघसाठी चांगले खेळले.

या स्पर्धेत २ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या दिवसाच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरुष शहर गटात गणेश आखाडे (रुपाली ज्वेलर्स, मुंबई), पुरुष ग्रामीण गटात राहुल भाकी (कुंभी कासारी कोल्हापूर) व महिला गटात अस्मिता जंगम (गोल्फादेवी प्र. मुंबई) यांना सुवर्ण पदक, प्रशस्ती पत्रक व रोख रकमेचे बक्षीस कल्याण आयुक्त रविराज इळवे व ज्येष्ठ कामगार नेते दिलीपदादा जगताप या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 
इतर निकाल –

पुरुष शहरी गट - रुपाली ज्वेलर्स वि.वि.भारत पेट्रोलियम ३९-१९, माझगाव डॉक वि.वि.महिंद्रा ब्रदर्स ३१-७, सगुणा बाग वि.वि.एल.आय.सी. ३७ -५, बँक ऑफ बडोदा वि.वि. एमएसआरटीसी ठाणे ४३-१७, मुंबई पोर्टस वि.वि. वाडिया मुंबई ४६-२२. एलआईसी. विवि सिंघानिया क्रियेटरस २४ - २१.

पुरुष ग्रामीण गट - साई टूर्स वि.वि.शेतकरी संघ कणकवली २१-१०, सापळे ऑटो कणकवली वि.वि. स्कोडा ऑटो संभाजीनगर ४५-३५ .

महिला खुला गट - ओमज्ञानदीप विवि तेजस्वनी स्पोर्ट्स क्लब २९ – ३७, होतकरू ठाणे वि.वि. ओम ज्ञानदीप ४५-१४, जय भारत स्पो.ठाणे वि.वि.चंद्रोदय ४८-१६, जय महाराष्ट्र कुडाळ वि.वि. हनुमान यवतमाळ ३३-२१.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.