काँग्रेसला दिल्लीत लोकसभेची एकच जागा; आपने उडवली खिल्ली

    13-Feb-2024
Total Views |
aam aadami party on INC in delhi loksabha

नवी दिल्ली : 
काँग्रेस पक्षाची दिल्लीतील कामगिरी आणि पक्षसंघटनेची स्थिती पाहता आम आदमी पक्ष (आप) काँग्रेसला सातपैकी केवळ एक जागा देऊ शकते, अशा शब्दात आपने काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीची (पीएसी) झाली. बैठकीनंतर आपचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस डॉ. संदीप पाठक यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.


संदीप म्हणाले की, 'आप'च्या पीएसीमध्य मुख्य चर्चा लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी यावर झाली. देशाच्या हितासाठी आम्ही भाजपचा पराभव करण्यासाठी भारत आघाडीसोबत एकत्र आलो आहोत. मात्र, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची कोणताही ताकद नाही. सध्या काँग्रेस दिल्लीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये शून्यावर आहे, तर महानगरपालिका निवडणुकीत २५० पैकी केवळ ९ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार तर काँग्रेसला लोकसभेची एकही जागा देण्याची गरज नाही. मात्र, काँग्रेसचा मान ठेवण्यासाठी आप एक जागा देत आहे, असे पाठक यांनी म्हटले आहे.

काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची शकले पडण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेसने आपापल्या राज्यांमध्ये प्रभाव वाढवू नये, यासाठी प्रादेशिक पक्ष काँग्रेसने कमीत कमी जागा लढवाव्यात असे प्रयत्न करत आहेत. सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत प. बंगालमध्ये आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले, त्यानंतर नितीश कुमार यांनी तर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच प्रवेश केला. त्यानंतर आता आम आदमी पक्षदेखील काँग्रेसला डिवचत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.