‘प्रसार भारती’चा ‘वेव्हज’द्वारे ओटीटी माध्यमात प्रवेश

    22-Nov-2024
Total Views | 46
Prasar Bharati

गोवा : गोव्यामध्ये सुरू असलेल्या ५५व्या ‘इफ्फी’ अर्थात ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘प्रसार भारती’ ( Prasar Bharati ) या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण माध्यमाच्या ‘वेव्हज’या ओटीटी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, ‘दूरदर्शन’ या भारताच्या अग्रगण्य सार्वजनिक प्रसार माध्यमाने ओटीटी व्यासपीठाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आधुनिक डिजिटल ट्रेंडचा स्वीकार करताना क्लासिक या श्रेणीतील सामग्री आणि समकालीन कार्यक्रमांचा समृद्ध संयोग साधत, प्रेक्षकांच्या गत काळातील आठवणी पुन्हा जागवणे, हे या व्यासपीठाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’ आणि ‘हम लोग’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचा संग्रह उपलब्ध करणारे हे व्यासपीठ, भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक बंध जोडू पाहणार्‍या प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करते.

‘वेव्हज’ने हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळी, तेलुगू, तामिळ, गुजराती, पंजाबी, आसामी यांसह १२ पेक्षा अधिक भाषांमधील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनासह भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या सर्वसमावेशक भारतीय कथांसह एक मोठा समूह म्हणून ओटीटी व्यासपीठावर प्रवेश केला आहे. इन्फोटेनमेंटच्या दहापेक्षा जास्त प्रकारांमध्ये त्याचा प्रसार केला जाईल. हे व्यासपीठ ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सचे पाठबळ असलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागणीनुसार व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, थेट टीव्ही स्ट्रीमिंग, ६५ लाईव्ह चॅनल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्रीसाठी अ‍ॅपचा समावेश असलेले अनेक अ‍ॅप आणि ऑनलाईन खरेदी यांसारख्या सेवा देणार आहेत.

‘वेव्हज’मध्ये ‘एफटीआयआय’, ‘अन्नपूर्णा’, ‘एएएफटी’ यांसारख्या चित्रपट आणि माध्यम प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी पूर्व वर्षात बनवलेल्या चित्रपटांसाठी आपले पोर्टल उपलब्ध करतील.

‘प्रसार भारती’चा एक ओटीटी मंच असावा अशी गरज वाटत होती, त्यामुळे ‘वेव्हज’ हा ओटीटी मंच सुरू करण्यात आला. एक राष्ट्रीय प्रसारणकर्ते म्हणून, आमचे हे कर्तव्य आहे की, कुटुंबाला एकत्र बसून पाहाता येईल. असे मनोरंजन सर्वांसाठी उपलब्ध करणे. त्याशिवाय, बातम्या, गेम्स, चालू घडामोडींवरील कार्यक्रमदेखील नागरिकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. भारताचा समृद्ध वारसा आणि इतिहास यांचे दर्शन या मंचावर घडेल. ‘वेव्हज’ ओटीटी डाऊनलोड करण्यासाठी आणि त्यावरील काही मोजके प्रिमिअर कार्यक्रम वगळता, इतर कार्यक्रम पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

नवनीत सिंग सहगल, अध्यक्ष, प्रसार भारती


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121