मनसुख हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होते?

    31-Oct-2024
Total Views | 115
 
Mansukh Hiren
 
मुंबई : मनसुख हिरेनची (Mansukh Hiren) झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळेच स्पष्ट होईल, अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सांगितले, की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडले. आता माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे , मनसूख हिरेनची हत्या होणार, हे त्यांना माहिती होते की नव्हते? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसूख हिरेनला गायब करण्यात आले असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचे समजले", याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121