वांद्र्यातल्या कट्ट्यावर बसलेले उमेश-प्रिया, दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात फोटो, २५ वर्षांनी सांगितला किस्सा

    26-Oct-2024
Total Views | 70
 
priya umesh
 
 
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
 
झी मराठी पुरस्कार सोहळ्याचं यंदा २५ वं वर्ष होतं. या निमित्तानं या २५ वर्षात गाजलेल्या सगळ्याच मालिकांमधील कलाकार हा सोहळ्याला हजर होते. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच,  लोकप्रिय मालिका आभाळमाया या मालिकेतील सर्व जुन्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावत सगळ्यांनाच भावूक केले.
 

priya umesh  
 
उमेश म्हणाला की, “एकदा आम्ही वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. सगळ्यांना माहितीच असतील ते स्पॉट्स. यावर प्रिया हसली. उमेश म्हणाला की, हे तुला पण नाही माहिती. आतापर्यंत आम्ही मुलाखतींमध्ये तेच तेच किस्से सांगितलेत. पण किस्सा आता पहिल्यांदाच सांगतोय. आम्ही तिथेच बाइक लावून, कट्ट्यावर बसलो होतो. हे सगळं लपवा लपवीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी प्रियाचा मला फोन आला घाबरून. एका पेपरात असा एक फोटो आलेला आहे. वांद्रे रेक्लेमेशनच्या कट्ट्यावर बसलेल्या कपल्सचा एक फोटो मुंबई वृत्तांतच्या पहिल्या पानावर आला होता. त्यामुळं पुढचे दोन दिवस आम्ही एकमेकांना समजवत होतो की, ते आपण आहोत हे नाही कळणार कोणाला”, उमेशने हा किस्सा सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. तर यावर पुढे प्रिया म्हणाली की, माझ्या मैत्रिणीच्या मावशीनं मला त्या फोटोत ओळखलं होतं, त्यानंतर मी घरी आलेल्या पेपरातून तो फोटो कापून टाकला होता..”
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121