...तर बांगलादेशचा अफगाणिस्तान आणि सीरिया होईल; अंतरिम सरकारला हिंदूंचा इशारा

    26-Oct-2024
Total Views |

hindus in Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Voice of Bangladeshi Hindu)
"जर कोणी हिंदूंना बांगलादेशातून बाहेर काढू इच्छित असेल तर बांगलादेशचा निश्चितपणे अफगाणिस्तान किंवा सीरिया होईल. लोकशाहीच्या शक्तीला तडे गेल्यास बांगलादेश जातीयवादाचे अभयारण्य बनेल.", असा इशारा बांगलादेशातील समस्त हिंदू बांधवांच्या वतीने येथील अंतरिम सरकारला देण्यात आला आहे. शुक्रवारी येथील लालदिघी मैदानावर मोठ्या संख्येने जमलेल्या हिंदू समुदायाला प्रख्यात हिंदू साधू चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांनी संबोधित केले.

हे वाचलंत का? : हिंदूंनी बेकायदा मशिदींविरोधात आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची धमकी

चिन्मय कृष्ण दास हे ब्रह्मचारी बांगलादेश सनातन जागरण मंचचे प्रवक्ते आणि पुंडरिक धामचे प्रमुख आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार ते म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या दडपशाहीविरोधात कारवाई व्हायला हवी. हिंदूंवरील हल्ले थांबले पाहिजेत. त्यांना कायदेशीर संरक्षण दिले पाहिजे." प्रशासनाने त्यांच्या ८ मागण्या मान्य कराव्यात यासाठी हिंदू निदर्शने करत होते.


hindus in Bangladesh

चिन्मय ब्रह्मचारी म्हणाले की, हिंदूंवर जेवढे अत्याचार होतील तेवढेच ते एकजूट होतील. ही एकता म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून बंगालच्या संस्कृतीची एकता. ही एकता कोणत्याही प्रकारे मोडता येणार नाही. सध्या आठ कलमी मागण्या पूर्ण करण्यासाठी १९ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी जाहीर केले की हिंदू प्रत्येक विभागात रॅली आणि प्रत्येक जिल्ह्यात सभा घेतील. संसदेमध्ये हिंदूंसाठी प्रमाणानुसार जागांची व्यवस्था करावी. गरज पडल्यास मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला. लोकशाहीच्या नावाखाली हा तमाशा खपवून घेतला जाणार नाही.

इतर वक्त्यांनी सांगितले की, बांगलादेशात स्वातंत्र्यापासून हिंदूंची नेहमीच उपेक्षा झाली आहे. प्रत्येक सरकार हिंदूंचे दु:ख, अन्याय आणि अत्याचार लपवण्याचा प्रयत्न करते. अनेक दशके अल्पसंख्याकांना खून, अत्याचार, जमीन बळकावणे, दडपशाहीचा न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दंडमुक्तीच्या संस्कृतीने गुन्हेगारांना अशा घटनांची पुनरावृत्ती करण्यास प्रोत्साहन दिले आहे.