‘भूल भुलैया ३’मधील गाण्यावर डान्स करताना विद्या बालनचा गेला तोल...

    26-Oct-2024
Total Views | 58
 
bhool bhulaiya 3
 
 
 
मुंबई : 'भूल भुलैय्या' या चित्रपटाच्या दोन यशस्वी भागांनंतर आता भूल भूलैय्या ३ हा चित्रपट दिवाळी निमित्त प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडतेच पण त्याहून जास्त आवडली ती यातील गाणी खासकरुन 'आमी जे तोमार' गाणं. नुकतंच या गाण्याची तिसऱ्या भागातील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. डान्सिंग क्विन माधुरी दीक्षित आणि ओरिजनल मंजुलिका यांनी एकत्रित एकाच स्टेजवर आमी जे तोमार या गाण्यावर नृत्य केलं. शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘आमी जे तोमार ३.o’ या गाण्यावर त्यांनी या दोन्ही अभिनेत्रींनी डान्स केला आहे. हा डान्स करताना विद्या बालन स्टेजवर खाली पडली; मात्र तिने ज्या पद्धतीने पुन्हा डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळे अभिनेत्रीचे सगळे कौतुक करत आहेत.
 
विद्या बालन आणि माधुरी दीक्षितच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावेळी डान्स करताना विद्या खाली पडली त्यावेळी डान्स न थांबविता माधुरी आणि विद्या यांनी एकमेकींना साथ देत पुढचे सादरीकरण केले. हे सर्व पाहून या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक होत आहे.
 

bhool bhulaiya 3 
 
भूल भुलैया ३’ च्या कथेबद्दल बोलायचे तर हा चित्रपट शतकानुशतके जुन्या वाड्यात राहणाऱ्या मंजुलिकाच्या आत्म्याबद्दल आहे. पहिल्या भागानंतर आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालनची एन्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय भूल भूलैय्या २ मध्ये पहिल्यांदाच माधुरी दीक्षित एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट धमाल आणणार यात शंकाच नाही.
 
भूल भूलैय्या ३ या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित व विद्या बालन यांच्याबरोबर तृप्ती डिमरीदेखील झळकणार आहे. याशिवाय, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, मनीष वाधवा, रोज सरदाना, कांचन मलिक आणि इतर कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार व मुराद खेतानी हे ‘भूल भुलैय्या’चे सहनिर्माते आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121