इराणने इस्त्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्र डागले, परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली काळजी

    02-Oct-2024
Total Views | 66


Iran vs Israel 
 
जेरुसलेम : इराण आणि इस्त्रायल या देशांतर्गत वाढता संघर्ष निर्माण झाला आहे. इराणने इस्त्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याने तणावाची परिस्थिती आहे. यामुळे आता इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना जागरूक राहा आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
 
याआधी मंगळवारी इस्त्रायल येथे भारतीय दूतावासाने आपल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शक प्रणाली जारी केली आणि त्यांना देशातील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
 
प्रदेशातील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. कृपया सावधगिरी बाळगा, आपली काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका. दूतावास या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्त्रायली अधिकारी नियमित संपर्कात आहेत. दूतावासाने एका निवेदनात लिहिले आहे. यामुळे आता चिंताग्रस्तांसाठी देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
 
याचपार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण परराष्ट्रमंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की,मंगळवारी मध्य पूर्वेतील वाढत्या संकटावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, भारत प्रदाशिक युद्धाच्या शक्यतेबद्दल खूप चिंतित आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121