हिंद - प्रशांत क्षेत्रासाठी शांततापूर्ण समाधानावर भारताचा भर – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

    26-Sep-2023
Total Views | 41

manoj pande

नवी दिल्ली :
अलिकडच्या वर्षांत हिंद - प्रशांत महासागर क्षेत्राने भू - रणनीतीमध्ये मध्यवर्ती स्थान व्यापले आहे. त्याचे महत्त्व आजच्या जगाच्या राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील उदयोन्मुख गतिशीलतेचे प्रतिबिंब आहे. असे प्रतिपादन हिंद प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले आहे.

लष्करप्रमुख म्हणाले की, जरी विविध देशांचे प्रयत्न मुक्त हिंद - प्रशांतच्या दिशेने वाटचाल करत असले तरी वाद आणि स्पर्धांचे प्रकटीकरण आपण पाहत आहोत. आम्हाला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रदेशातील सर्व भागधारकांना सकारात्मकतेने गुंतवून ठेवण्याची भारताची वचनबद्धता अटल आणि टिकाऊ आहे. हिंद - प्रशांत क्षेत्रासाठी भारताचा दृष्टिकोन विवादांचे शांततापूर्ण निराकरण, बळाचा वापर टाळणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन यावर भर देतो, असेही ते म्हणाले.
 
हिंद - प्रशांत क्षेत्राच्या महत्त्वावर भर देताना जनरल पांडे म्हणाले की, हा प्रदेश केवळ राष्ट्रांचा समुह नाही, यामध्ये परस्परावलंबनाचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे विश्वास निर्माण करणे आणि सहकार्य मजबूत करणे हे भारताचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
विरार, वेळास, मालवणमार्गे अमूर ससाणा सोमालियासाठी रवाना; ७६ तास न थांबता ३,१०० किमीचे उड्डाण

विरार, वेळास, मालवणमार्गे अमूर ससाणा सोमालियासाठी रवाना; ७६ तास न थांबता ३,१०० किमीचे उड्डाण

'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूर वन विभागाच्या मदतीने 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावलेल्या तीन अमूर ससाणा पक्ष्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन अरबी समुद्रावर झेप घेऊन आफ्रिकेतील सोमालियाच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला (amur falcon migration). यामधील 'अपापांग' नामक नर अमूर ससाणा पक्ष्याने मणिपूर ते वेळास हे अंतर ७६ तास न थांबता उडून पूर्ण केले आणि वेळासच्या परिसरातून शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात प्रवेश केला (amur falcon migration). तर इतर दोन पक्ष्यांनी शनिवार आणि रविवारी ..

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121