मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एमआयडीसी, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात एमआयडीसीकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण ८०२ जागा भरल्या जाणार आहेत.
दरम्यान, अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या विविध पदांसाठी दि. ०२ सप्टेंबर २०२३ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, उमेदवारास अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दि. २५ सप्टेंबर २०२३ असणार आहे. त्यामुळे अधिसूचनेत विहित असणाऱ्या मुदतपूर्वी अर्ज दाखल करणे उमेदवारास बंधनकारक असणार आहे.
भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता विविध पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तसेच, उमेदवारांना अर्ज शुल्क आकारले जाणार असून खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु.१,०००/- तर मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/- असणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
एमआयडीसी, मुंबई येथील भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.